Join us

‘Baby AB’ Dewald Brevis, MI vs KKR IPL 2022 Live Updates : मुंबई इंडियन्सने 'Baby AB' ला मैदानावर उतरवला, तर KKRच्या ताफ्यात यशस्वी गोलंदाज परतला

Mumbai Indians vs Kolkata Knight Riders IPL 2022 Live Updates : मुंबई इंडियन्सची सालाबादाप्रमाणे आयपीएलमध्ये सुरुवात झाली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2022 19:13 IST

Open in App

Mumbai Indians vs Kolkata Knight Riders IPL 2022 Live Updates : मुंबई इंडियन्सची सालाबादाप्रमाणे आयपीएलमध्ये सुरुवात झाली आहे. त्यांना दोन्ही सामने गमवावे लागले आहेत आणि IPL 2022 Point Table मध्ये गुणांची पाटी कोरी असलेल्या तीन संघांत MI चा समावेश आहे. आज पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या मैदानावर मुंबई इंडियन्सचा मुकाबला कोलकाता नाईट रायडर्ससोबत होणार आहे. आजच्या सामन्यात सूर्यकुमार यादवचे ( Suryakumar Yadav) पुनरागमन निश्चित मानले जात आहे. KKRचीही गाडी रुळावरून घसरली आहे. कोलकाताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. 

पॅट कमिन्सने  क्वारंटाईन कालावधी पूर्ण केला आहे आणि तो आजच्या सामन्यात टीम साऊदीच्या जागी खेळणार आहे. सुनील नरीन, आंद्रे रसेल व सॅम बिलिंग्स हे अन्य तीन परदेशी खेळाडू संघात आहेत. सूर्यकुमारसाठी मुंबई इंडियन्सने अनमोलप्रीत सिंगला बाकावर बसवले आहे. कोलकाताने २२ वर्षीय गोलंदाज रसिख सलामला आज पदार्पणाची संधी दिली आहे. जम्मू काश्मीरचा रसिख हा मुंबई इंडियन्सचा माजी खेळाडू आहे. 

मुंबई इंडियन्स - रोहित शर्मा, इशान किशन, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, किरॉन पोलार्ड, डेवॉल्ड ब्रेव्हिस , डॅनिएल सॅम्स, मुरूगन अश्विन, बसील थम्पी, जसप्रीत बुमराह  

कोलकाता नाईट रायडर्स - वेंकटेश अय्यर, अजिंक्य रहाणे, श्रेयस अय्यर, नितिश राणा, शेल्डन जॅक्सन, आंद्रे रसेल, सुनील नरीन,  पॅट कमिन्स, उमेश यादव, वरुण चक्रवर्थी, रसिख सलाम  

टॅग्स :आयपीएल २०२२मुंबई इंडियन्ससूर्यकुमार अशोक यादवकोलकाता नाईट रायडर्स
Open in App