MI vs GT: 'तुला मानलं भाऊ...' विराट कोहलीने केलं सूर्यकुमारचं कौतुक

विराट कोहलीने त्याच्या इंस्टाग्राम स्टोरीवर सूर्यकुमारचा फोटो शेअर केला .

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2023 22:57 IST2023-05-12T22:56:46+5:302023-05-12T22:57:44+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
MI vs GT: 'Tula maanal bro...' Virat Kohli praises Suryakumar | MI vs GT: 'तुला मानलं भाऊ...' विराट कोहलीने केलं सूर्यकुमारचं कौतुक

MI vs GT: 'तुला मानलं भाऊ...' विराट कोहलीने केलं सूर्यकुमारचं कौतुक


MI vs GT, IPL 2023 Live : आज मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर IPL 2023 चे पहिले शतक आले आहे. मुंबई इंडियन्सच्या सूर्यकुमार यादवने अवघ्या 49 बॉलमध्ये 103 धावा केल्या. त्यात त्याने 11 चौकार आणि 6 षटकार लगावले. त्याच्या या कामगिरीनंतर टीम इंडियाचा माजी कर्णधार विराट कोहलीने सूर्याचे कौतूक केले आहे. 

विराट कोहलीने त्याच्या इंस्टाग्राम स्टोरीवर सूर्यकुमारचा फोटो शेअर केला असून, त्यासोबत 'तुला मानलं भाऊ' असे कॅप्शन दिले आहे. यापूर्वीही विराटने राजस्थान रॉयल्सच्या यशस्वी जयस्वालचे कौतुक केले होते. यशस्वीने केकेआरविरोधात 98 धावांची खेळी केली. दरम्यान, सूर्यकुमारच्या शतकाच्या जोरावर मुंबई इंडियन्सनेगुजरात टायटन्सला 219 धावांचे आव्हान दिले.

टॉस जिंकून गुजरातने गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. मैदानात उतरलेल्या मुंबईच्या सलामीवीरांनी संघाला जोरदार सुरुवात करुन दिली. पॉवरप्लेमध्ये रोहित आणि इशानने 61 धावा काढल्या. या जोडीला राशिद खानच्या फिरकीने तोडले. यानंतर सुर्यकुमारने विष्णू विनोदसोहत मुंबईला पुढे नेले. चौकार आणि षटकारांच्या जोरावर सुर्यकुमारने IPL 2023 चे पहिले शतक झळकावले.

Web Title: MI vs GT: 'Tula maanal bro...' Virat Kohli praises Suryakumar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.