Rashid Khan MI Cape Town Captain : अफगाणिस्तानचा स्टार ऑल राउंडर हा आयपीएलमध्ये गुजरात टायटन्सच्या ताफ्यातून खेळताना दिसते. पण दक्षिण आफ्रिकेतील लीगमध्ये तो मुंबई इंडियन्स फ्रँचायझी संघाचा भाग आहे. आता तिसऱ्या हंगामासाठी MI फ्रँचायझी संघानं राशिद खानवर मोठी जबाबदारी दिलीये. तो पुन्हा एकदा SA20 लीगमध्ये MI फ्रँचायझी संघाचे नेतृत्व करताना दिसणार आहे. राशिद खान केरॉन पोलार्डच्या जागी MI केपटाउन संघाचा कॅप्टन झाला आहे.
SAटी२० लीगच्या गत हंगामात MI फ्रँचायझी संघाची कामगिरी
गत हंगामात मुंबई इंडियन्स केपटाउन संघाला फारशी चांगली कामगिरी करता आली नव्हती. MI फ्रँचायझी संघानं गत हंगामात १० पैकी फक्त ३ सामने जिंकले होते. यावेळी संघ पुन्हा एकदा जेतेपद मिळवण्याच्या इराद्याने मैदानात उतरल्याचे पाहायला मिळाले. राशिद खान या संघा कॅप्टन होण्याची ही काही पहिली वेळ नाही. पहिल्या हंगामात तो या संघाचे नेतृत्व करताना दिसला होता.
याआधीही मिळाली होती कॅप्टन्सी, पण...
राशिद खान याने SA20 लीगमधील पहिल्या हंगामात MI केपटाउन संघाची कॅप्टन्सी केली होती. पण स्टार गोलंदाज आपल्या कॅप्टन्सीची छाप सोडण्यात अपयशी ठरला. गत हंगामात दुखापतीमुळे राशिद खान या स्पर्धेत खेळताना दिसला नव्हता. आता कमबॅक करताना तो कॅप्टन्सीची छाप सोडून संघाला पहिले जेतेपद मिळवून देण्याच्या इराद्याने मैदानात उतरले. SA20 लीगध्ये राशिद खान याने आतापर्यंत १० सामने खेळले आहेत. यात ९ विकेट आणि ५२ धावा केल्या आहेत.
बेन स्टोक्स पहिल्यांदाच मुंबई इंडियन्स फ्रँचायझीकडून खेळणार
SA20 लीगच्या तिसऱ्या हंगामात अनेक दिग्गज क्रिकेटर आपला जलवा दाखवण्यासाठी तयार आहेत. यात बेन स्टोक्स आणि ट्रेंट बोल्ट यासारख्या स्टार क्रिकेटर्सचा समावेश आहे. बोल्ट याआधी मुंबई इंडियन्स फ्रँचायझी संघासोबत खेळताना दिसला आहे. पण यावेळी दक्षिण आफ्रिकेतील लीगच्या माध्यमातून बेन स्टोक्स पहिल्यांदाच मुंबई इंडियन्सशी कनेक्ट होणार आहे. दक्षिण आफ्रिकेतील टी२० लीग ९ जानेवारी ते ८ फेब्रुवारी या कालावधीत खेळवण्यात येणार आहे.