ऑस्ट्रेलिया दौऱ्यात टी-२० मालिका गमावल्यावर दक्षिण आफ्रिकेच्या संघानं दमदार कमबॅक करताना तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतील पहिल्या सामन्यात मोठा विजय नोंदवला आहे. क्वीन्सलँडच्या केर्न्स शहरातील कॅझली स्टेडियमवर खेळवण्यात आलेल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेच्या संघाने यजमान ऑस्ट्रेलियाला ९८ धावांनी मात दिली. ३१ वर्षांचा रेकॉर्ड मोडीत काढत ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिकेच्या संघाने मिळवलेला हा सर्वात मोठा विजय ठरलाय. याशिवाय पहिल्या वनडेत दक्षिण आफ्रिकेच्या ताफ्यातील मॅथ्यू ब्रीट्झके (Matthew Breetzke) याने वर्ल्ड रेकॉर्डचा मोठा डाव साधला आहे. इथं एक नजर टाकुयात त्याने २९० धावांसह सेट केलेल्या खास रेकॉर्डबद्दल...
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
झोकात पदार्पण, तिसऱ्या सामन्यात फिफ्टी प्लसचा आकडा गाठत सेट केला वर्ल्ड रेकॉर्ड
दक्षिण आफ्रिकेच्या विजयात मोलाचा वाटा उचलताना मॅथ्यू ब्रीट्झके याने ५६ चेंडूत ७ चौकारआणि एका षटकाराच्या मदतीने ५७ धावांची खेळी केली. याच वर्षी दक्षिण आफ्रिकेच्या संघाकडून वनडेत पदार्पण करताना त्याने १५० धावांची खेळी केली होती. दुसऱ्या वनडे सामन्यात त्याने ८३ धावांची खेळी केली. आता आपल्या वनडे कारकिर्दीतील तिसऱ्या सामन्यात अर्धशतकी खेळी करत त्याने नवा वर्ल्ड रेकॉर्ड सेट केलाय. वनडेत पदार्पण केल्यावर पहिल्या ३ सामन्यात त्याने २९० धावा केल्या आहेत. हा एक वर्ल्ड रेकॉर्ड आहे.
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
आधी या क्रिकेटरच्या नावे होता रेकॉर्ड
वनडे पदार्पणातील पहिल्या तीन सामन्यात सर्वाधिक धावा करण्याचा रेकॉर्ड या आधी इंग्लिश क्रिकेटर निक नाइट (Nick Knight) याच्या नावे होता. या क्रिकेटरनं आपल्या पहिल्या तीन वनडे सामन्यात २६४ धावा केल्या होत्या. हा विक्रम मोडीत काढत आता दक्षिण आफ्रिकेचा बॅटरनं वर्ल्ड रेकॉर्ड आपल्या नावे केलाय.
Web Title: Matthew Breetzke: The best of Africa's batting! Sets a new world record in ODIs with 290 runs
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.