यूएईच्या मैदानात रंगणाऱ्या आशिया कप स्पर्धेला ९ सप्टेंबरपासून सुरुवात होत आहे. आशियाई क्रिकेट परिषदेनं टी-२० प्रकारात खेळवण्यात येणाऱ्या स्पर्धेसाठी पंच आणि सामनाधिकाऱ्यांची घोषणा केली आहे. अनुभवी मॅच रेफ्री रिची रिचर्डसन आणि अँडी पाइक्रॉफ्ट या टीमचे नेतृत्व करताना दिसणार आहेत. पंच आणि सामनाधिकाऱ्यांच्या टीममध्ये वेगवेगळ्या देशाच्या चेहऱ्यांचा समावेश आहे. यात दोन भारतीयांचा समावेश आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
आशिया कप स्पर्धेत १० अंपायर्सची निवड
भारताच्या वीरेंद्र शर्मा आणि रोहन पंडित यांच्यासर श्रीलंकेच्या रवींद्र विमलसिरी आणि रुचिरा पल्लियागुरुगे यांचा अंपायर पॅनलमध्ये समावेश करण्यात आला आहे. अफगागाणिस्तानचे अहमद पाकतीन आणि इजातुल्लाह सफी, पाकिस्तानचे आसिफ याकूब आणि फेसल आफ्रिदी आणि बांग्लादेशच्या गाझी सोहेल आणि मसूदुर रहमान हे पंचही आशिया कप स्पर्धेत पंचगिरी करताना दिसणार आहेत.
Asia Cup साठी टीम इंडियात मिळाले नाही स्थान; नाराजीतही श्रेयस अय्यरनं दाखवला मनाचा मोठेपणा
भारत-पाकिस्तान मॅचसाठी खास टीम
आशिया कप स्पर्धेत १४ सप्टेंबरला भारत-पाक यांच्यातील हायहोल्टेज सामना रंगणार आहे. या सामन्यासाठी अँडी पाइक्रॉफ्ट यांच्याकडे सामनाधिकाऱ्याची जबाबदारी देण्यात आलीये. या सामन्यात रुचिरा पल्लियागुरुगे आणि मसूदुर रहमान हे मैदानातील पंचाच्या भूमिकेत दिसतील. पंच रुचिरा पल्लियागुरुगे हे चुकीच्या निर्णयामुळे चर्चेत राहिलेला चेहरा आहे. २०१९ च्या वनडे वर्ल्ड कप स्पर्धेत ऑस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडिज सामन्यात या पंचाने अनेक चुकीचे निर्णय दिले होते. परिणामी वेस्ट इंडिजला पराभवाचा सामना करावा लागला होता. एवढेच नाही तर मागच्या वर्षी भारत-श्रीलंका यांच्यातील द्विपक्षीय मालिकेतही हा पंच वादग्रस्त निर्णयामुळे चर्चेत आला होता. भारत-पाक सामन्यात तो आपलं काम चोख बजावणार का? ते पाहण्याजोगे असेल.
प्रबळ दावेदार आहे टीम इंडिया
आशिया कप स्पर्धेत भारतीय संघ १० सप्टेंबरला यूएई विरुद्धच्या सामन्याने आपल्या मोहिमेची सुरुवात करेल. १४ सप्टेंबरला पाकिस्तान विरुद्ध सामना खेळल्यावर साखळी फेरीतील अखेरच्या सामन्यात भारतीय संघ ओमानला भिडणार आहे. या गटातून सुपर फोरमध्येच नाही तर फायनलपर्यंत मजल मारत टीम इंडियाच यावेळी जेतेपद पटकावेल, अशी आशा आहे. या स्पर्धेसाठी भारतीय संघाने तगडी संघबांधणी केली असून आयसीसीच्या यूएईच्या मैदानात संघातील खेळाडूंनी कसून सराव केल्याचेही दिसून आले.
Web Title: Match Referees Richie Richardson And Andy Pycroft Head The Panel Of Officials For Asia Cup T20 Includes Indias Virender Sharma India vs Pakistan Ruchira Palliyaguruge And Masudur Rahman
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.