Champions Trophy Final : बरं झालं! टीम इंडियासाठी 'अनलकी' ठरलेल्या अंपायरला ICC नं 'गायब' केलं

भारतीय संघासाठी बहुतांश आयसीसी स्पर्धेत अनलकी ठरलेला चेहरा यंदाच्या ऑफिशियल्समध्येही होता. पण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2025 22:09 IST2025-03-06T22:08:49+5:302025-03-06T22:09:43+5:30

whatsapp join usJoin us
Match officials named for the ChampionsTrophy 2025 grand finale between India and New Zealand | Champions Trophy Final : बरं झालं! टीम इंडियासाठी 'अनलकी' ठरलेल्या अंपायरला ICC नं 'गायब' केलं

Champions Trophy Final : बरं झालं! टीम इंडियासाठी 'अनलकी' ठरलेल्या अंपायरला ICC नं 'गायब' केलं

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

Match Officials For Champions Trophy 2025 Final: आंतरारष्ट्रीय क्रिकेट परिषदेनं भारत-न्यूझीलंड यांच्यात रंगणाऱ्या मेगा फायनलसाठी पंच आणि सामनाधिकाऱ्यांची घोषणा केली आहे. ९ मार्चला दुबईच्या मैदानात चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेची फायनल रंगणार आहे. या सामन्यात भारतीय संघाचे पारडे जड आहे. कारण साखळी फेरीत भारतीय संघानं न्यूझीलंडला आधीच मात दिलीये. त्यामुळे मानसिकरित्या भारतीय संघ सकारात्मक दृष्टिकोनासह अधिक आत्मविश्वासाने मैदानात उतरेल. एवढेच नाहीतर मध्यफळतील बॅटिंगमध्ये दिसलेली धमक आणि चार फिरकीपटूंची जादू या गोष्टी भारतीय संघाला फायनलच्या शर्यती न्यूझीलंडपेक्षा आघाडीवर ठेवणाऱ्या आहेत. 

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! 

बरं झालं! मेगा फायलमध्ये नाही दिसणार तो 'अनलकी' चेहरा 

पण क्रिकेटच्या मैदानात बऱ्याचदा लक फॅक्टरचा मुद्दाही चर्चेत  असतो. अंपायरच्या रुपात मॅचवेळी मैदानात दिसलेले काही चेहरे लकी ठरतात तर काही चेहऱ्यांना अनलकीचा टॅग लागतो. भारतीय संघासाठी बहुतांश आयसीसी स्पर्धेत अनलकी ठरलेला चेहरा यंदाच्या ऑफिशियल्समध्येही होता.  इंग्लंडचे पंच रिचर्ड केटलबरो (Richard Kettleborough) असं या पंचाच नाव आहे. हा पंच असला की, भारतीय संघानं फायनल मॅच गमावली, असा सीन मागील काही आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत पाहायला मिळाला. पण सेमीप्रमाणे फायलमध्येही हा पंच मैदानात किंवा टेलिव्हिजन अंपायरच्या रुपात दिसणार नाही. बरं झालं अनलकी अंपायरला ICC नं गायब केलं, अशीच भावना फायनचे ऑफिशियल्स पाहिल्यावर क्रिकेट चाहत्यांची असेल. 

फायनलमध्ये कोण आहेत मैदानी पंच, रेफ्रीच्या रुपात कोण?

आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेतील भारत-न्यूझीलंड यांच्यातील फायनलसाठी पॉल रीफेल आणि रिचर्ड इलिंगवर्थ या दोघांवर मैदानातील पंचगिरीची जबाबादारी सोपवण्यात आली आहे. भारतीय संघानं २०२४ मध्ये टी-२० वर्ल्ड कप जिंकला त्यावेळी रिचर्ड इलिंगवर्थ हेच मैदानी पंच होते. तिसऱ्या पंचाच्या रुपात जोएल विल्सन, फोर्थ अंपायरच्या रुपात कुमार धर्मसेना आणि सामनाधिकाऱ्याच्या रुपात रंजन मदुगले हे काम पाहतील. 

Web Title: Match officials named for the ChampionsTrophy 2025 grand finale between India and New Zealand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.