हार्दिकच्या पुनरागमनामुळे भारत भक्कम; दक्षिण आफ्रिकेविरुद्ध आजपासून रंगणार सामना

एकदिवसीय क्रिकेट : दक्षिण आफ्रिकेविरुद्ध आजपासून रंगणार तीन सामन्यांचा थरार

By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2020 03:40 AM2020-03-12T03:40:53+5:302020-03-12T03:42:03+5:30

whatsapp join usJoin us
The match against South Africa will start todays Hardik Pandya will play | हार्दिकच्या पुनरागमनामुळे भारत भक्कम; दक्षिण आफ्रिकेविरुद्ध आजपासून रंगणार सामना

हार्दिकच्या पुनरागमनामुळे भारत भक्कम; दक्षिण आफ्रिकेविरुद्ध आजपासून रंगणार सामना

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

धर्मशाळा : स्टार अष्टपैलू हार्दिक पांड्याचे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये बहुप्रतीक्षित पुनरागमन झाले आहे. यामुळे गुरुवारपासून दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सुरू होत असलेल्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत भारतीय संघ न्यूझीलंड दौऱ्यातील अपयश झटकून नव्या उत्साहाने सुरुवात करण्यास सज्ज झाला आहे. न्यूझीलंड दौºयात एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत भारताला ‘व्हाईटवॉश’ची नामुष्की पत्करावी लागली होती.

कोरोना व्हायरसचे संकट आणि पावसाच्या शक्यतेत खेळल्या जाणाºया पहिल्या सामन्यात हार्दिकच्या रूपाने कर्णधार कोहलीकडे पर्याय उपलब्ध असेल. हार्दिक वर्षभराआधी विश्वचषकाच्या उपांत्य सामन्यात मँचेस्टर येथे न्यूझीलंडविरुद्ध अखेरचा सामना खेळला होता. नुकताच त्याने डीवाय पाटील मैदानावर अष्टपैलू कामगिरी करीत राष्ट्रीय संघात पुनरागमन केले.

भारतीय संघ न्यूझीलंड दौैºयात दोन कसोटींसह सलग पाच आंतरराष्ट्रीय सामन्यात पराभूत झाला. कर्णधार कोहलीचा खराब फॉर्म सुरूच आहे. न्यूझीलंडविरुद्ध तीन सामन्यात त्याने केवळ ७५ धावा केल्या होत्या. टी२० विश्वचषकामुळे एकदिवसीय सामन्याला अधिक महत्त्व देत नसल्याचे वक्तव्य करीत त्याने टीकाकारांना संधी उपलब्ध करून दिली आहे. पांड्याशिवाय शिखर धवन आणि भुवनेश्वर कुमार यांचेही पुनरागमन झाल्याने कागदावर यजमान संघ तगडा वाटतो. पाहुण्या संघाकडेही क्विंटन डिकॉक, फाफ डुप्लेसिस, डेव्हिड मिलर असे अनुभवी खेळाडू आहेत. 

च्द. आफ्रिका संघ ऑस्ट्रेलियाविरुद्ध ३-० ने विजय मिळवून येथे दाखल झाला. त्या मालिकेत बाहेर राहिलेले फाफ डुप्लेसिस आणि रेसी वान डेर येथे आले आहेत. कर्णधारपद सोडणारा फाफ डुप्लेसिस भारताविरुद्ध धडाकेबाज फलंदाजी करण्याच्या मूडमध्ये असून हेन्रिक क्लासेन, केली वेरीने जेमॅन मलान हेही भारतासाठी डोकेदुखी ठरू शकतात. द. आफ्रिका संघ धर्मशाळा येथे पहिला सामना खेळत असून भारताने येथे चार सामने खेळताना दोन जिंकले असून दोन सामने गमावले होते. या मैदानावर धावांचा पाठलाग करणाºया संघाने चारपैकी तीनवेळा विजय मिळविला, हे विशेष.

भारत : विराट कोहली (कर्णधार), शिखर धवन, पृथ्वी शॉ, लोकेश राहुल, मनीष पांडे, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, भुवनेश्वर कुमार, युझवेंद्र चहल, जसप्रीत बुमराह, शुभमन गिल, नवदीप सैनी आणि कुलदीप यादव.
दक्षिण आफ्रीका : क्विंटन डिकॉक (कर्णधार), तेम्बा बावुमा, रेसी वान डेर डुसेन, फाफ डुप्लेसिस, कोली वेरीने, हेन्रिक क्लासेन, जेनमॅन मलान, डेव्हिड मिलर, जॉन-जॉन स्मट्स, एन्डिले फेहलुकवायो, लुंगी एनगिडी, लूथो सिपामला, एन्रिक नोर्टजे, ब्युरोन हेंड्रिक्स, जॉर्ज लिंडे आणि केशव महाराज.

कोरोना, पावसाचा तिकीट विक्रीला फटका
कोरोना व्हायरस व खराब हवामानामुळे या सामन्याच्या तिकीट विक्रीला चांगलाच फटका बसला. हिमाचल प्रदेश क्रिकेट संघटनेच्या माहितीनुसार मंगळवारपर्यंत २२ हजारांपैकी १६ हजार तिकीटांची विक्री झाली. येथे आंतरराष्टÑीय सामना असला की तिकिटांची मोठी मागणी असते, मात्र यंदा कोरोनाची धास्ती आहे. दरवेळी किमान एक हजार विदेशी पर्यटक सामना पाहायचे. यंदा मात्र तसे दिसत नाही. याशिवाय पंजाब, हरियाणा आणि दिल्लीहून क्रिकेट चाहते यायचे. यावेळी मात्र असे चित्र दिसत नाही.

चेंडूसाठी लाळेचा मर्यादित वापर - भुवनेश्वर
‘वैद्यकीय सल्ल्यानुसार चेंडूला चकाकी आणण्यासाठी लाळेचा मर्यादित वापर केला जाईल,’ असे संकेत वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार याने बुधवारी दिले. संघाच्या बैठकीदरम्यान वैद्यकीय पथक यावर मार्गदर्शन करणार असल्याचे सांगून भुवी म्हणाला, ‘चेंडूला चकाकी आणण्यासाठी लाळेचा वापर किती करायचा याविषयी वैद्यकीय सल्ला घेणार आहोत. लाळेचा वापर न केल्यास चेंडू चमकणार नाही, आमच्याविरुद्ध अधिक धावा निघतील तेव्हा तुम्ही पुन्हा ढिसाळ गोलंदाजीचा ठपका ठेवाल.’
द. आफ्रिकेचा कर्णधार क्विंंटन डिकॉक याने मात्र चेंडूला चकाकी आणण्यासाठी लाळेचा योग्य प्रमाणात वापर केला जाईल, असे स्पष्ट केले. तो म्हणाला,‘ लाळेमध्ये विषाणू नसतात. कोरोनाचा प्रकोप असला तरी हात धुणे, खोकणे, शिंकणे या गोष्टींपासून आम्ही सावधपणा बाळगत आहोत. आम्ही सर्वजण फिट असून चेंडू चमकविण्यासाठी कुठलीही कसर शिल्लक राखणार नाही. चाहत्यांसोबत सेल्फी काढणे, हस्तांदोलन करणे आणि गर्दीचा सामना टाळणे आदींची खबरदारी घेतली जात असल्याने आम्ही स्वत:ला येथे सुरक्षित मानत आहोत.’

Web Title: The match against South Africa will start todays Hardik Pandya will play

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.