Join us
Daily Top 2Weekly Top 5

VIDEO: मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडने घेतला 'सुपरमॅन' कॅच; हवेत उडी घेऊन टिपला झेल

Ruturaj Gaikwad Catch Viral Video: रियान परागने हवेत चेंडू मारताच ऋतुराजने झेप घेतली अन्...

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 21, 2024 20:57 IST

Open in App

Ruturaj Gaikwad Catch Viral Video: भारत आणि बांगलादेश यांच्यातील कसोटी मालिकेत स्टार फलंदाज ऋतुराज गायकवाडला संधी मिळालेली नाही. तो दुलीप ट्रॉफीमध्ये भारत सी संघाकडून खेळत आहे. या स्पर्धेत ऋतुराज संघाचा कर्णधार आहे. त्याच्या नेतृत्वाखाली इंडिया सी संघाने चमकदार कामगिरी केली आहे. त्यांनी दोनपैकी एक सामना जिंकला आहे. तर एक सामना अनिर्णित राखला आहे. भारत सी सध्या ९ गुणांसह गुणतालिकेत पहिल्या स्थानावर आहे. भारत सी आणि भारत ए यांच्यात सध्या तिसरा सामना होत आहे. या सामन्याच्या दुसऱ्या डावात ऋतुराजने घेतलेला झेल चांगलाच चर्चेत राहिला आणि तो व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. 

भारत ए संघाने तिसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत भारत सी विरुद्ध दुसऱ्या डावात ३३३ धावांची आघाडी घेतली. भारत ए संघाने पहिल्या डावात २९७ धावा केल्या होत्या. त्यानंतर भारत सी संघ २३४ धावांवर बाद झाला. आता भारत ए संघाने दुसऱ्या डावात ६ बाद २७० धावा केल्या. या सामन्यात एक असा क्षण आला ज्यात भारत सी संघाचा कर्णधार ऋतुराजने जबरदस्त झेल घेतला. तो सोशल मीडियावर व्हायरल झाला. गायकवाडने डावीकडे हवेत झेप घेत झेल घेतला आणि रियान परागला पॅव्हेलियनमध्ये परत पाठवले. पाहा व्हिडीओ-

डावाच्या ४९ व्या षटकात गायकवाडने हा झेल टिपला. रियान पराग ७३ धावांवर खेळत होता. तो शतकाकडे वाटचाल करत होता. चौकार खेचण्याच्या नादात परागने एक्स्ट्रॉ कव्हरवरून चेंडू मारला, पण गायकवाडने चेंडूचा अंदाज घेत झेल घेतला.

टॅग्स :ऋतुराज गायकवाडसोशल मीडिया