Team India Cricketer getting divorced : भारतातील लग्नसंस्था ही सध्या चर्चेचा विषय ठरताना दिसतोय. विशेषत: काही भारतीय क्रिकेटपटूंची लग्न मोडल्याच्या घटना कानावर आल्यानंतर हा विषय जास्त चर्चिला जाऊ लागला आहे. भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या याने मॉडेल-अभिनेत्री नताशा स्टँकोविच हिच्याशी प्रेमविवाह केला होता. त्यांना अगस्त्य नावाचा एक मुलगाही झाला. पण काही वर्षांनी त्यांनी घटस्फोट घेतला. हा प्रकार ताजा असतानाच फिरकीपटू युजवेंद्र चहल याच्याबाबतीतही तेच घडले. मॉडेल-डान्सर धनश्री वर्मा हिच्याशी त्याने प्रेमविवाह केला होता. पण सध्या सुरु असलेल्या चर्चांनुसार, त्यांच्याही घटस्फोट होत असल्याचे सांगितले जात आहे. या दोघांनंतर आता आणखी एका क्रिकेटपटूचा अभिनेत्रीशी सुरु असलेला संसार मोडणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. ही जो़डी म्हणजे मनीष पांडे आणि आश्रिता शेट्टी ( Manish Pandey Ashrita Shetty Divorce). का रंगलीय ही चर्चा, जाणून घेऊया.
मनीष पांडे IPL मध्ये खेळत असतो. तसेच, २०१८च्या आशिया कप स्पर्धेत तो टीम इंडियाचा भाग होता. त्यानंतर त्याला संघात स्थान मिळालेले नाही. मनीष पांडे आणि आश्रिता शेट्टी यांचे वैवाहिक जीवन काहीसे गोंधळलेले असल्याच्या चर्चा सध्या सुरु आहेत. डिसेंबर २०१९ मध्ये लग्न झालेली ही जोडी एकमेकांपासून विभक्त होण्याच्या मार्गावर असल्याची चर्चा सर्वत्र सुरु आहे. मनीष आणि आश्रिता दीर्घ काळापासून कुठेही एकत्र दिसलेले नाहीत. या दोघांनीही सोशल मीडिया इन्स्टाग्रामवर एकमेकांना अनफॉलो केले आहे. तसेच, या दोघांनीही आपल्या अकाउंटवरून लग्नाचे सर्व फोटो डिलीट केले आहेत.
आश्रिता शेट्टी कोण आहे?
आश्रिता शेट्टी ही एक अभिनेत्री आहे. तिने आतापर्यंत अनेक तामिळ चित्रपट केले आहेत. तसेच ती IPL मध्येही मनीष पांडेला कायम सपोर्ट करायला हजर असायची. पण गेल्या दोन हंगामात मात्र ती तेथेही दिसलेली नाही. आश्रिता सोशल मीडियावर खूप अँक्टिव्ह असून तिचे 218K फॉलोअर्स आहेत. तिला पर्यटनाची आवड असून, तिच्या प्रोफइलवरून त्याची कल्पना येते.