भारतीय चाहते आयपीएल, टी-२० विश्वचषक आणि न्यूझीलंडविरुद्धच्या टी-२० मालिकेनंतर न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी सज्ज झाले आहेत. या निमित्तानेच आता चर्चा रंगली आहे ती कोणता खेळाडू कोणता सामना गाजवणार. प्रत्येक सामन्यात सर्वोत्तम खेळ करणाऱ्या खेळाडूला सामनावीर पुरस्काराने गौरविण्यात येते. कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक सामनावीर पुरस्कार पटकावणारे आघाडीचे सर्व १० खेळाडू हे निवृत्त झाले आहेत.
२३ वेळा सामनावीर पुरस्कार पटकावण्याचा विश्वविक्रम दक्षिण आफ्रिकेच्या जॅक कॅलिसच्या नावावर आहे. तसेच दहाव्या स्थानावरील श्रीलंकेच्या माहेला जयवर्धनेच्या नावावर १३ सामनावीर पुरस्कार आहेत. यामध्ये एकमेव भारतीय म्हणून मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर असून, तो नवव्या स्थानी १४ पुरस्कारांसह आहे. क्रिकेटपटूंची नवी पिढी आता या सर्वोत्तम खेळाडूंच्या यादीत स्थान मिळवण्याच्या उंबरठ्यावर आहे. स्मिथ, रुट, ब्रॉड, स्टोक्स व कोहली या सर्वांनाच आपल्या आगामी मालिकेतून विक्रम नोंदवण्याची संधी आहे.
![]()
जो रुट, अष्टपैलू, इंग्लंड -
पदार्पण : भारत
(१३ डिसेंबर २०१२)
सामने : १०९
धावा : ९,२७८
शतके : २३
अर्धशतके : ५०
सर्वोच्च : २५४
बळी : ३९
सर्वोत्तम : ५/८
सामनावीर : १२
स्टुअर्ट ब्रॉड, गोलंदाज, इंग्लंड
पदार्पण : श्रीलंका
(९ डिसेंबर २००७)
सामने : १४९
धावा : ३,३७०
शतके : १
अर्धशतके : १३
सर्वोच्च : १६९
बळी : ५२४
सर्वोत्तम : ८/१५
सामनावीर : १०
बेन स्टोक्स, अष्टपैलू, इंग्लंड
पदार्पण : ऑस्ट्रेलिया
(५ डिसेंबर २०१३)
सामने : ७१
धावा : ४,६३१
शतके : १०
अर्धशतके : २४
सर्वोच्च : २५८
बळी : १६३
सर्वोत्तम : ६/२२
सामनावीर : ९
विराट कोहली, फलंदाज, भारत
पदार्पण : वेस्ट इंडिज
(२० जून २०११)
सामने : ९६
धावा : ७,७६५
शतके : २७
अर्धशतके : २७
सर्वोच्च : २५४*
सामनावीर : ९
स्टीव्ह स्मिथ, फलंदाज, ऑस्ट्रेलिया
पदार्पण : पाकिस्तान
(१३ जुलै २०१०)
सामने : ७७
धावा : ७,५४०
शतके : २७
अर्धशतके : ३१
सर्वोच्च : २३९
सामनावीर : १२