Join us

T20I World Record : ८ चेंडूत ५ विकेट्स! 'लिंबू टिंबू' संघातील गोलंदाजानं सेट केला वर्ल्ड रेकॉर्ड

पहिल्या षटकात ओव्हर हॅटट्रिकचा डाव; मग दुसऱ्या षटकातील दुसऱ्या चेंडूवर मारला 'पंजा'

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2025 17:11 IST

Open in App

Mahesh Tambe Fastest Five Wicket Haul In T20I : आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये 'लिंबू टिंबू' संघातील अर्थात नियमित सदस्य नसलेल्या दोन संघात झालेल्या टी-२० सामन्यात वर्ल्ड रेकॉर्डची नोंद झाली आहे. रविवारी झालेल्या सामन्यात फिनलंडचा अष्टपैलू क्रिकेटर महेश तांबे याने एस्टोनिया विरुद्धच्या सामन्यात अवघ्या ८ चेंडूत पाच विकेट्सचा डाव साधला. आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटममधील हा सर्वात वेगवान 'पंजा' ठरला आहे.

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! 

पहिल्या षटकात ओव्हर हॅटट्रिकचा डाव

फिनलंड आणि एस्टोनिया (Finland vs Estonia) यांच्यातील तिसऱ्या टी -२० सामन्यात पहिल्यांदा फलंदाजी करताना २ बाद १०४ धावा अशा मजबूत अवस्थेत असलेल्या एस्टोनिया संघ १४१ धावांवर ऑल आउट झाला. १७ व्या षटकात गोलंदाजीला आलेल्या महेश तांबेनं आपल्या पहिल्याच षटकातील ओव्हर हॅटट्रिकचा डाव साधला. पण तो इथंच थांबला नाही. दुसऱ्या षटकात आणखी २ विकेट्स आपल्या खात्यात जमा करत त्याने ८ व्या चेंडूवर 'पंजा' मारला. 

IND vs ENG: टीम इंडियाला मोठा धक्का! ऋषभ पंत पाचव्या कसोटीतून बाहेर, CSKच्या खेळाडूला संघात स्थान

...अन् सेट झाला आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये नवा विक्रम

या कामगिरीसह आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये सर्वात जलद (कमी चेंडूत) पाच विकेट्स घेण्याचा विक्रम महेश तांबेच्या नावे झाला आहे. याआधी हा विक्रम बहरीनच्या जुनैद अजीज याच्या नावे होता. त्याने १० चेंडूत पाच विकेट्स घेतल्या होत्या. ICC च्या पूर्ण सदस्यीय संघांमध्ये सर्वात जलद पाच विकेट्स घेण्याचा विक्रम हा राशीद खानच्या नावे आहे. त्याने ११ चेंडूत अशी कामगिरी नोंदवली आहे. 

कोण आहे महेश तांबे?

महेश तांबे हा फिनलंड राष्ट्रीय क्रिकेट संघाकडून बॉलिंग ऑलराउंडरच्या रुपात खेळतो. उजव्या हाताने मध्यम जलदगती गोलंदाजीशिवाय तो उजव्या हाताने फलंदाजीतही उपयुक्त ठरेल असा खेळाडू आहे. आतापर्यंत त्याने २४ टी सामने खेळले असून फलंदाजीत २३ डावात त्याच्या खात्यात १४० धावा जमा आहेत. गोलंदाजीत त्याने २८ डावात २८ विकेट्स आपल्या खात्यात जमा केल्या असून १९ धावा खर्चून पाच विकेट्स ही त्याची सर्वोच्च कामगिरी आहे.

 T20I मध्ये सर्वात कमी चेंडूत पाच विकेट्स घेणारे गोलंदाज

  • ८ चेंडू – महेश तांबे (फिनलंड)
  • १० चेंडू – जुनैद अजीज (बहरीन)
  • ११ चेंडू – राशीद खान (अफगाणिस्तान)
  • ११ चेंडू – मुअज्जम बैग (मलावी)
  • ११ चेंडू – खिजर हयात (मलेशिया) 
टॅग्स :टी-20 क्रिकेटआयसीसी