Join us

महेंद्रसिंग धोनी आता राजकारणाच्या मैदानात?; अमित शहा यांनी घेतली भेट

शहा यांनी नवी दिल्ली येथे धोनीची भेट घेतली. शहा यांच्याबरोबर केंद्रीय रेल्वे मंत्री पीयुष गोयलही हजर होते. पुढील वर्षी लोकसभा निवडणूका होणार आहेत. या निवडणूकीपूर्वी शहा हे देशातील काही मान्यवरांची भेट घेत आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2018 15:13 IST

Open in App
ठळक मुद्देधोनी आता बीजेपीमध्ये जाणार का, या चर्चांना सुरुवात झाली आहे.

नवी दिल्ली : इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय क्रिकेट मालिकेत भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीवर टीका झाली होती. त्यानंतर धोनीने क्रिकेटमधून निवृत्ती घ्यावी, असे सल्लेही त्याला दिले गेले. त्यामुळेच कदाचित धोनी आता राजकारणाच्या मैदानात उतरण्याचा विचार करत असावा, असे दिसत आहे. कारण भारतीय जनता पक्षाचे (बीजेपी) अध्यक्ष अमित शहा यांनी आज धोनीची भेट घेतली. त्यामुळे धोनी आता बीजेपीमध्ये जाणार का, या चर्चांना सुरुवात झाली आहे.

भाजपचे सध्या संपर्क अभियान सुरु आहे. या अभियाना अंतर्गत शहा यांनी नवी दिल्ली येथे धोनीची भेट घेतली. शहा यांच्याबरोबर केंद्रीय रेल्वे मंत्री पीयुष गोयलही हजर होते. पुढील वर्षी लोकसभा निवडणूका होणार आहेत. या निवडणूकीपूर्वी शहा हे देशातील काही मान्यवरांची भेट घेत आहेत. यापूर्वी शहा यांनी रतन टाटा, लता मंगेशकर, माधुरी दीक्षित यांचीही भेट घेतली होती. 

टॅग्स :महेंद्रसिंह धोनीअमित शाहभाजपा