IPL च्या धर्तीवर महाराष्ट्र प्रीमिअर लीगचा थरार; कोल्हापूरसह ६ संघ रिंगणात, उद्या लिलाव

maharashtra premier league 2023 players list : पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियममध्ये हा थरार रंगेल.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 5, 2023 03:12 PM2023-06-05T15:12:03+5:302023-06-05T15:12:12+5:30

whatsapp join usJoin us
Maharashtra Premier League will start from June 15 and there will be 6 teams from Pune, Kolhapur, Nashik, Chhatrapati Sambhajinagar, Ratnagiri and Solapur  | IPL च्या धर्तीवर महाराष्ट्र प्रीमिअर लीगचा थरार; कोल्हापूरसह ६ संघ रिंगणात, उद्या लिलाव

IPL च्या धर्तीवर महाराष्ट्र प्रीमिअर लीगचा थरार; कोल्हापूरसह ६ संघ रिंगणात, उद्या लिलाव

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

मुंबई : IPL च्या धर्तीवर महाराष्ट्र प्रीमिअर लीगचे (maharashtra premier league 2023) आयोजन करण्यात आले आहे. या लीगमुळे महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील खेळाडूंना स्वत:ला सिद्ध करण्याचं नवं व्यासपीठ मिळणार आहे. यामध्ये भारतासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळलेले खेळाडू केदार जाधव, राहुल त्रिपाठी आणि ऋतुराज गायकवाड यांचाही सहभाग असणार आहे. १५ ते २९ जून या कालावधीत ही स्पर्धा खेळवली जाईल. पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियममध्ये हा थरार रंगेल.

१५ जूनपासून थरार 
"भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (BCCI) विद्यमाने महाराष्ट्र प्रीमिअर लीग पुरुषांची ट्वेंटी-२० क्रिकेट स्पर्धा सुरू करणे हा माझ्यासाठी आणि MCA साठी अभिमानाचा क्षण आहे", असं महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष रोहित पवार यांनी सांगितले. तसेच स्पर्धेच्या पहिल्या हंगामात सहा संघ रिंगणात असतील असंही त्यांनी सांगितलं. महाराष्ट्र राज्यातील नवीन क्रिकेटपटूंना व्यावसायिक स्तरावर त्यांची प्रतिभा दाखवण्यासाठी आणि राष्ट्रीय स्तरावर ओळख मिळवून देण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देणे हा एमपीएलच्या आयोजनामागचा महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचा उद्देश आहे, असं रोहित पवारांनी अधिक सांगितलं.

उद्या होणार लिलाव 
दरम्यान, महाराष्ट्र प्रीमिअर लीगच्या पहिल्या हंगामासाठी उद्या म्हणजेच ६ जून मंगळवारी लिलाव प्रक्रिया पार पडणार आहे. लक्षणीय बाब म्हणजे पुणे, छत्रपती संभाजीनगर, जळगाव, कोल्हापूर, सांगली, सातारा, अहमदनगर, बीड, धुळे, बुलढाणा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, सोलापूर येथून २०० हून अधिक खेळाडूंनी लिलाव प्रक्रियेसाठी नोंदणी केली आहे. २० लाखांच्या पर्सचा उद्या लिलाव होणार आहे.

महाराष्ट्र प्रीमियर लीगचे आयकॉन खेळाडू - 

  1. पुणे - ऋतुराज गायकवाड 
  2. कोल्हापूर - केदार जाधव 
  3. नाशिक - राहुल त्रिपाठी 
  4. छत्रपती संभाजीनगर - राजवर्धन हंगरगेकर
  5. रत्नागिरी - अजीम काजी 
  6. सोलापूर - विकी ओस्तवाल 

Web Title: Maharashtra Premier League will start from June 15 and there will be 6 teams from Pune, Kolhapur, Nashik, Chhatrapati Sambhajinagar, Ratnagiri and Solapur 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.