Prithvi Shaw vs Vaibhav Suryavanshi In Syed Mushtaq Ali Trophy 2025 : सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीसाठी सुरु असलेल्या देशांतर्गत टी-२० लीगमध्ये एक से बढकर एक भारतीय खेळाडू धमाकेदार खेळीसह लक्षवेधून घेताना दिसत आहे. महाराष्ट्र विरुद्ध बिहार यांच्यातील कोलकाताच्या ईडन गार्डन्सच्या मैदानावर रंगलेल्या सामन्यात पहिल्यांदा फलंदाजी करताना वैभव सूर्यवंशीचा शतकी धमाका पाहायला मिळाला. सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी स्पर्धेतील पहिल्या सेंच्युरीसह १४ वर्षीय पोरानं इतिहास रचला. पण त्याच्या या खेळीला प्रत्त्युतर देताना पृथ्वी शॉनं खेळलेली आक्रमक अंदाजातील खेळी भारी ठरली.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
वैभव सूर्यवंशीच्या सेंच्युरीवर भारी पडली पृथ्वीची धुवांधार खेळी
वैभव सूर्यवंशीच्या शतकी खेळीच्या जोरावर बिहारच्या संघाने पृथ्वीच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्र संघासमोर निर्धारित २० षटकात ३ बाद १७६ धावा करत पृथ्वीच्या नेृत्वाखालील महाराष्ट्र संघासमोर १७६ धावांचे टार्गेट सेट केले होते. या धावांचा पाठलाग करताना पृथ्वी शॉनं धमाकेदार खेळीचा नजराणा पेश करताना यदाच्या हंगामातील सलग दुसरे अर्धशतक झळकावले. ३० चेंडूत ११ चौकार आणि १ षटकाराच्या मदतीनं २२० च्या स्ट्राइक रेटसह त्याने ६६ धावांची खेळी केली. त्याची ही खेळी वैभव सूर्यवंशीच्या विश्वविक्रमी शतकावर भारी पडली. कारण महाराष्ट्र संघाने हा सामना ५ चेंडू आणि ३ गडी राखून खिशात घातली.
२२ व्या अर्धशतकासह पृथ्वीनं पार केला मैलाचा पल्ला
पृथ्वी शॉनं टी-२० क्रिकेटमधील २२ व्या अर्धशतकासह महाराष्ट्र संघाला विजय मिळवून देताना खास विक्रमाला गवसणी घातली आहे. टी-२० क्रिकेटमध्ये त्याने ३००० धावांचा पल्ला पार केला आहे. मुंबईच्या संघातून महाराष्ट्र संघात आल्यापासून पृथ्वी कमालीची कामगिरी करताना दिसत आहे. रणजी स्पर्धेतील पहिल्या टप्प्यातील ५ सामन्यात त्याने ६७ च्या सरासरीसह ४७० धावा काढल्या आहेत. आता टी-२० मध्ये तो आपल्या हिट शॉ दाखवताना दिसतोय. पृथ्वीची सातत्यपूर्ण सर्वोत्तम कामगिरी महाराष्ट्र संघासाठी जमेची बाजू तर आहेच. याशिवाय देशांतर्गत टी-२० लीगमधील स्फोटक अंदाजामुळे पुन्हा एकदा त्याच्यासाठी IPL चे दरवाजे खुले होण्यासही मदत मिळेल. मेगा लिलावात त्याला अनसोल्डचा टॅग लागला होता.
Web Summary : Prithvi Shaw's explosive innings, featuring a rapid-fire 66, outshone Vaibhav Suryavanshi's historic century in the Syed Mushtaq Ali Trophy. Shaw's performance led Maharashtra to victory, overshadowing Suryavanshi's milestone. Shaw also reached 3000 T20 runs.
Web Summary : पृथ्वी शॉ की तूफानी पारी, जिसमें उन्होंने तेजी से 66 रन बनाए, सैयद मुश्ताक अली ट्रॉफी में वैभव सूर्यवंशी के ऐतिहासिक शतक पर भारी पड़ी। शॉ के प्रदर्शन ने महाराष्ट्र को जीत दिलाई, सूर्यवंशी का मील का पत्थर फीका पड़ गया। शॉ ने 3000 टी20 रन भी पूरे किए।