Join us

IND vs AUS : अखेर ऑस्ट्रेलिया जिंकली! कांगारुंनी केला भारताचा 21 धावांनी पराभव

पहिल्या तीन वन-डे सामन्यात विराटसेनेसमोर निष्प्रभ ठरलेल्या कांगारुंनी चौथ्या वन-डेत भारताचा 21धावांनी पराभव करत मालिकेतील पहिला विजय साजरा केला.

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2017 21:52 IST

Open in App

बंगळुरु - पहिल्या तीन वन-डे सामन्यात विराटसेनेसमोर निष्प्रभ ठरलेल्या कांगारुंनी चौथ्या वन-डेत भारताचा 21धावांनी पराभव करत मालिकेतील पहिला विजय साजरा केला. ऑस्ट्रेलियानं दिलेल्या 335 धावांच्या विराट आव्हाना पाठलाग करताना भारत निर्धारित 50 षटकांत आठ बाद 313 धावांपर्यंत मजल मारु शकला.  मुंबईकर अजिंक्य रहाणे आणि रोहित शर्मा यांनी सलामीला शतकी भागिदारी करत भारताच्या डावाला आकार दिला. मात्र त्यानंतर ठराविक अंतरांनी फंलदाज बाद झाल्यानं भारताचा डाव गडगडला. केदार जाधव (67), अजिंक्य रहाणे(53), रोहित (65), हार्दिक पांड्या (41) आणि मनिष पांडे (33)  यांची खेळी संघाला विजय मिळून देण्यात तोकडी ठरली.  विराट कोहली(21) आणि धोनी(13) यांचे प्रयत्न अपुरे पडले. ऑस्ट्रेलियाकडून केन रिचर्डसन भारताच्या तीन फलंदाजांना बाद केलं. तर नाथन कूल्टर नाईलनं दोघांना तंबूत झाडले. 

चौथ्या वन-डे सामन्यात ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. डेव्हिड वॉर्नर आणि अॅरोन फिंच या सलामीवीरांनी केलेल्या झंझावाती फटकेबाजीच्या बळावर कांगारुंनी भारतासमोर 335 धावांचे आव्हान ठेवलं आहे. वॉर्नर आणि फिंच जोडीनं 35 षटकांत 231 धावांची भागिदारी करत मोठ्या धावसंख्येचा पाया रचला. निर्धारित 50 षटकांत ऑस्ट्रेलियानं पाच विकेटच्या मोबदल्यात 334 धावां केल्या. 

एकवेळ ऑस्ट्रेलिया 380 धावा करेल असं वाटत होतं मात्र केदार जाधवनं डेव्हिड वॉर्नरला बाद करत भारतासमोरीलम मोठा अडथळा दूर केला. वॉर्नरनं 119 चेंडूत 124 धावांची खेळी केली. याखेळीदरम्यान त्यानं चार षटकार आणि 12 चौकार लगावले. वॉर्नर बाद झाल्यानंतर फिंचही लगेच बाद झाला. फिंचनं 96 चेंडूत 94 धावांची खेळी केली. यादरम्यान त्यानं तीन षटकार आणि 10 चौकार लगावले. त्याला उमेश यादवनं पांड्याकरवी झेलबाद केलं.

दीर्घ विश्रांतीनंतर संघात पुनरागमन केलेल्या उमेश यादवनं प्रभावी मारा करताना चार कांगारुंची शिकार केली. उमेश यादव शिवाय केदार जाधवला एक विकेट मिळाली. अन्य गोलंदाज बळी घेण्यात अपयशी ठरले. 

- ऑस्ट्रेलियाचा 21 धावांनी विजय, 335 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताच्या 50 षटकात 8 बाद 313 धावा

- भारताला आठवा धक्का

-पराभवाच्या छायेत, विजयासाठी 7 चेंडूत 29 धावांची गरज 

-भारताला विजयासाठी 10 चेंडूत 32 धावांची गरज

- भारताला विजयासाठी 11 चेंडूत 33 धावांची गरज

- भारताला विजयासाठी 12 चेंडूत 34 धावांची गरज

- धोनी त्रिफळाचित, भारताला विजयासाठी 13 चेंडूत 34 धावांची गरज

- भारताला विजयासाठी 18 चेंडूत 40 धावांची गरज

- सर्व भिस्त धोनीवर, भारताला विजयासाठी 21 चेंडूत 41 धावांची गरज

- भारताला सहावा धक्का, जाधवनंतर पांडेही झाला बाद. विजयासाठी 23 चेंडूत 46 धावांची गरज. धोनी आणि पांडे मैदानाव

- जाधव बाद, भारताला विजयासाठी 25 चेंडूत 48 धावांची गरज

 - भारताला पाचवा धक्का, केदार जाधव 65 धावांवर बाद.भारताला विजयासाठी 26 चेंडूत 49 धावांची गरज

-  केदार-पांडेंची जोडी जमली, भारताला विजयासाठी 30 चेंडूत 53 धावांची गरज

-भारताला विजयासाठी 33 चेंडूत 54 धावांची गरज

- चौथा वन-डे - केदार जाधवचे शानदार अर्धशतक, भारताला विजयासाठी 54 चेंडूत 88 धावांची गरज

-  78 चेंडूत 110 धावांची गरज, हार्दिक पांड्या बाद

-जाधव -पांड्यानं डाव सावरला, भारताला विजयासाठी 117 धावांची गरज

- 34 षटकानंतर भारताच्या तीन बाद 213 धावा. केदार जाधव(38 ) आणि हार्दिक पांड्या (33) खेळत आहेत. 

- शेवटचे वृत्त आले तेव्हा भारतानं 25 षटकांत तीन बाद 149 धावा केल्या आहेत. 

- भारताला मोठा धक्का, कर्णधार विराट कोहली 21 धावांवर बाद.

-भारताला दुसरा धक्का, रोहित शर्मा 65 धावांवर झाला धावबाद. भारत 23 षटकांत 2 बाद 135 धावा

- 21 षटकांनंतर भारताच्या एक बाद 119 धावा, कोहली-रोहित मैदानात

- मुंबईकर अजिंक्य रहाणेचं अर्धशतक, भारताच्या 16 षटकानंतर बिनबाद 89 धावा

- 9 षटकानंतर भारताच्या 59 धावा, रोहित शर्मा(25) आणि रहाणे (32) धावांवर खेळत आहेत

 

टॅग्स :बीसीसीआयभारतीय क्रिकेट संघआॅस्ट्रेलिया