ICC T20I Rankings : टी-वर्ल्ड कप आधी टीम इंडियाची बादशाहत कायम; पाकिस्तान जवळपासही नाही

पाकिस्तान झेप घेतली, पण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2026 14:30 IST2026-02-04T14:29:20+5:302026-02-04T14:30:10+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
Latest ICC T20I Team Rankings Updated Last Time Ahead Of T20 World Cup 2026 India At Top Pakistan Out Of 5 | ICC T20I Rankings : टी-वर्ल्ड कप आधी टीम इंडियाची बादशाहत कायम; पाकिस्तान जवळपासही नाही

ICC T20I Rankings : टी-वर्ल्ड कप आधी टीम इंडियाची बादशाहत कायम; पाकिस्तान जवळपासही नाही

भारत आणि श्रीलंका यांच्या यजमानपदाखाली होणाऱ्या टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेआधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनं टी-२० क्रमवारी जाहीर केली आहे. गत टी-२० वर्ल्ड कप विजेता भारतीय संघाने आपला दबदबा कायम  ठेवला असून पाकिस्तान क्रमवारीत टीम इंडियाच्या जवळपासही दिसत नाही. इथं एक नजर टाकुयात नव्या ICC टी-२० क्रमवारीत कोण कितव्या स्थानावर आहे त्यासंदर्भातील सविस्तर माहिती

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
 

इंग्लंड–श्रीलंका मालिकेचा क्रमवारीवर परिणाम नाही

टी २० वर्ल्ड कप स्पर्धेपूर्वी इंग्लंड आणि श्रीलंका यांच्यात अखेरची आंतरारष्ट्रीय टी २० मालिका खेळवण्यात आली. या मालिकेत इंग्लंडने यजमान श्रीलंकेचा ३-० असा धुव्वा उडवला. मात्र, या मोठ्या मालिका विजयानंतरही क्रमवारीत बदल झाल्याचे दिसत नाही. इंग्लंडचा संघ या कामगिरीनंतरही तिसऱ्या क्रमांकावर असून श्रीलंकेचा संघ आठव्या स्थानावर कायम आहे.

IND vs PAK : हायहोल्टेज सामन्याआधी ड्रामा! अश्विन म्हणतो; पाकिस्तान लवकरच यू टर्न घेईल अन्...

पाकिस्तान झेप घेतली, पण...

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या घरच्या मैदानातील टी-२० मालिकेत पाकिस्तानच्या संघाने ३-० असा विजय नोंदवला. या कामगिरीसह पाकिस्तानच्या संघाने दोन वेळचा वर्ल्ड चॅम्पियन वेस्ट इंडिजला मागे टाकत सहाव्या स्थानावर झेप घेतली आहे. पण टॉप ५ मध्ये त्यांना एन्ट्री मारता आलेली नाही.

ICC रँकिंगमध्ये आघाडीच्या पाचमध्ये कोण?

ICC च्या टी-२० क्रमवारीत भारतीय संघ २७३  रेटिंग पॉइंट्स मिळवत अव्वलस्थानावर आहे. त्यापाठोपाठ ऑस्ट्रेलियाचा नंबर लागतो. त्यांच्या खात्यात २६१ रेटिंग पॉइंट्स आहेत. इंग्लंड, न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिकेच्या संघाने अनुक्रमे, २५९ (रेटिंग), २५१ (रेटिंग) आणि (२४१) रेटिंगसह अव्वल पाचमध्ये स्थान टिकवून ठेवले आहे.

क्रमांकसंघरेटिंग पॉइंट्स२०२६ T20 वर्ल्ड कप खेळणार की नाही?
भारत२७३होय
ऑस्ट्रेलिया२६१होय
इंग्लंड२५९होय
न्यूझीलंड२५१होय
दक्षिण आफ्रिका२४१होय
पाकिस्तान२३८होय
वेस्ट इंडिज२३४होय
श्रीलंका२२७होय
बांगलादेश२२३नाही
१०अफगाणिस्तान२२२होय
११आयर्लंड२०१होय
१२झिम्बाब्वे२००होय
१३नेदरलँड्स१८२होय
१४स्कॉटलंड१८२होय
१५नामिबिया१८१होय
१६नेपाळ१७६होय
१७यूएई१७६होय
१८यूएसए१७५होय
१९कॅनडा१५४होय
२०ओमान१५२होय
२१युगांडा१४२नाही
२२पापुआ न्यू गिनी१३६नाही
२३कुवेत१३०नाही
२४हाँगकाँग१२७नाही
२५मलेशिया१२५नाही
२६बहारीन११९नाही
२७इटली११९होय
२८जर्सी११७नाही
२९कतार११४नाही
३०स्पेन११३नाही

Web Title : आईसीसी टी20आई रैंकिंग: टी20 वर्ल्ड कप से पहले टीम इंडिया का दबदबा, पाकिस्तान पीछे

Web Summary : टी20 वर्ल्ड कप से पहले आईसीसी रैंकिंग में भारत शीर्ष पर है, पाकिस्तान काफी पीछे। इंग्लैंड ने श्रीलंका को हराया, पर रैंकिंग में बदलाव नहीं। ऑस्ट्रेलिया को हराकर पाकिस्तान छठे पर, टॉप 5 से बाहर।

Web Title : ICC T20I Rankings: India Leads Before World Cup; Pakistan Trails

Web Summary : India tops ICC T20I rankings before the World Cup, while Pakistan lags. England's series win over Sri Lanka didn't affect rankings. Pakistan jumped to sixth after defeating Australia, but remains outside the top five.