Join us  

WADAला धक्का; आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूला द्यावी लागली साडेतीन कोटींची भरपाई

जागतिक प्रतिबंधक द्रव्य संस्थेला ( WADA) मंगळवारी मोठा धक्का बसला. वाडानं पाच वर्षांपूर्वी चुकीचा अहवाल सादर केल्यानं एका आंतरराष्ट्रीय  क्रिकेपटूवर बंदीची कारवाई करण्यात आली होती.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 10, 2020 12:49 PM

Open in App

जागतिक प्रतिबंधक द्रव्य संस्थेला ( WADA) मंगळवारी मोठा धक्का बसला. वाडानं पाच वर्षांपूर्वी चुकीचा अहवाल सादर केल्यानं एका आंतरराष्ट्रीय  क्रिकेपटूवर बंदीची कारवाई करण्यात आली होती. पण, तो अहवाल चुकीचा असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे या क्रिकेटपटूला आता WADAला नुकसान भरपाई म्हणून ३ कोटी ६८ लाख ८९, २८८ रुपये द्यावे लागले आहेत. 

श्रीलंकेचा यष्टिरक्षक-फलंदाज कुसल परेरावर WADAने डिसेंबर २०१५ मध्ये प्रतिबंधात्मक द्रव्याचे सेवन केल्या प्रकरणी निलंबित केले होते. पण, WADAने चुकीचा अहवाल सादर केल्याचे उघड झाले आहे आणि त्यामुळे त्याला ५ लाख अमेरिकन डॉलरची नुकसान भरपाई द्यावी लागली आहे. श्रीलंकन क्रिकेटचे माजी अध्यक्ष थिलंगा सुमाथिपाला यांनीही या वृत्ताला दुजोरा दिला. 

याविरोधात परेरानं त्याच्या न्यायालयीन टीमसोबत अपील केले. मार्च २०१६मध्ये परेरा इंग्लंडमध्ये गेला आणि तेथे त्याची पॉलीग्राफ चाचणी झाली. शिवाय त्याच्या केसांचे सॅम्पलही फॉरेंसिक लॅबमध्ये पाठवण्यात आले. लघवीचे नमुनेही घेतले होते. पॉलीग्राफ चाचणीत कोणत्याही प्रकारच्या प्रतिबंधक द्रव्याचे सेवन न केल्याचे समोर आले. हा अहवाल आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेकडे पाठवण्यात आला. पण, या कालावधील परेराला महत्त्वांच्या स्पर्धांना मुकावे लागले. त्यात आशिया कप आणि ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेचाही समावेश होता.  

अन्य महत्त्वाच्या बातम्या

...रंगामध्ये भिजंल तुझं गोरं गोरं अंग, हार्दिक-नताशा रंगले प्रेमाच्या रंगात!

Corona Virus मुळे Asia XI vs World XI सामने रद्द? बीसीसीआयचे संकेत

Mumbai Indiansच्या अष्टपैलू खेळाडूला दुखापत, ट्वेंटी-२० लीगमधून माघार

'काचेच्या घरात राहणाऱ्यांनी दिवे लावून कपडे बदलू नये', आकाश चोप्रानं पाक चाहत्याला सुनावलं!

टॅग्स :श्रीलंकाआयसीसी