...रंगामध्ये भिजंल तुझं गोरं गोरं अंग, हार्दिक-नताशा रंगले प्रेमाच्या रंगात!

भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या दुखापतीतून पूर्णपणे सावरला आहे. नुकत्याच झालेल्या डी वाय पाटील ट्वेंटी-२० क्रिकेट स्पर्धेत त्यानं दोन शतकी खेळी केल्या होत्या.

त्याच्या कामगिरीवर निवड समितीही लक्ष ठेवून होती आणि म्हणूनच टीम इंडियाच्या आगामी द. आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत हार्दिकची निवड करण्यात आली.

१२ मार्चपासून तीन वन डे सामन्यांच्या मालिकेला सुरुवात होणार आहे. तत्पूर्वी, हार्दिकनं आज कुटुंबीयांसोबत धुळीवंदन साजरा केला.

यावेळी त्यांच्या कुटुंबीयात नव्यानं सामील झालेली बॉलिवूड अभिनेत्री नताशा स्टँकोव्हिचचाही समावेश होता. नताशानेही पांड्या कुटुंबीयांसोबत धुळीवंदन साजरा केला.

यंदा नववर्षाच्या पहिल्याच दिवशी नताशाने हार्दिक पांड्यासोबत साखरपुडा करून सर्वांना आनंदाचा धक्का दिला होता.

बोल्ड नताशा आता पांड्या कुटुंबाची सून होणार आहे. यानंतर नताशा चांगलीच लाईमलाईटमध्ये आली आहे.

इमरान हाश्मीच्या ‘द बॉडी’ या सिनेमात गाण्यात नताशा आयटम सॉन्ग करताना दिसली होती. 2018 मध्ये प्रदर्शित ‘झिरो’ या सिनेमात तिने एक छोटीशी भूमिका साकारली होती.

त्यापूर्वी सत्याग्रह, फुकरे रिटर्न, डॅडी या सिनेमात तिने आयटम नंबर केले होते.

हार्दिक-नताशा गेली अनेक महिने एकमेकांना डेट करत होते. त्यांना अनेकवेळा एकत्रही पाहिले गेले.

काही महिन्यांपूर्वी हार्दिकनं मुंबईत झालेल्या एका पार्टीमध्ये भाऊ कृणालची नताशाशी ओळख करुन दिली होती. त्यानंतर त्यांच्या प्रेमाचं अंकुर अजून फुललं...