Corona Virus मुळे Asia XI vs World XI सामने रद्द? बीसीसीआयचे संकेत

बांगलादेश क्रिकेट मंडळाच्या यजमानपदाखाली दोन ट्वेंटी-२० सामने होणार आहेत. विराट कोहली, लोकेश राहुल, कुलदीप यादव, मोहम्मद शमी आदी भारतीय खेळाडू खेळणार

By ऑनलाइन लोकमत | Published: March 10, 2020 11:30 AM2020-03-10T11:30:23+5:302020-03-10T11:32:55+5:30

whatsapp join usJoin us
Asia XI vs World XI match in doubtful, say BCB official svg | Corona Virus मुळे Asia XI vs World XI सामने रद्द? बीसीसीआयचे संकेत

Corona Virus मुळे Asia XI vs World XI सामने रद्द? बीसीसीआयचे संकेत

whatsapp join usJoin usgoogleNewsNext
ठळक मुद्देबांगलादेश क्रिकेट मंडळाच्या यजमानपदाखाली दोन ट्वेंटी-२० सामने होणार आहेत.विराट कोहली, लोकेश राहुल, कुलदीप यादव, मोहम्मद शमी आदी भारतीय खेळाडू खेळणार

शेख मुजीबूर रहमान यांच्या 100व्या स्मृतिदिनानिमित्त बांगलादेश क्रिकेट मंडळ ( बीसीबी) Asia XI vs World XI यांच्यात दोन ट्वेंटी-20 सामन्यांच्या आयोजन करण्याचा निर्णय घेतला. पण, Corona Virus मुळे हे सामने रद्द होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. बांगलादेशचे राष्ट्रपिता म्हणून शेख मुजीबूर रहमान ओळखले जातात. त्यांच्या स्मृतिदिनानिमित्त ढाका येथील शेर-ए-बांगला स्टेडियमवर ट्वेंटी-20 सामने खेळवण्यात येणार आहे. या सामन्यात टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीसह सहा भारतीय खेळाडू आशिया एकादश संघाचे प्रतिनिधित्व करणार आहेत. 

कोरोना विषाणुंमुळे जगभरात आत्तापर्यंत ३६६१ लोकांचा मृत्यू झाला आहे. रविवारी एकाच दिवसात १७५२ जणांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली, त्यापैकी ८९ लोकांचा मृत्यू झाला आहे. चीनमध्ये जवळपास ८० हजार कोरोनाग्रस्त असल्याचे पुढे आले आहे. त्यापैकी ३००० जणांचा मृत्यू कोरोनामुळेच झाल्याची माहिती आहे. जगभरात १ लाख ०७ हजार ८०३ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. भारतात कोरोनाचे ४३ रुग्ण आढळले. या पार्श्वभुमीवर बांगलादेश क्रिकेट मंडळही काही निर्णय घेण्याची शक्यता आहे. 

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील तीन सामन्यांच्या वन डे मालिकेनंतर Asia XI and World XI यांच्यातील दोन ट्वेंटी-२० सामने होणार आहेत. पण, या सामन्याला होणारी गर्दी आणि कोरोना व्हायरस यामुळे हे सामने रद्द होण्याची शक्यता आहे. बीसीसीआयच्या अधिकाऱ्याने सांगितले की,'' Asia XI and World XI या सामन्यांवर संभ्रमाचे वातावरण आहे. पण, अद्याप कोणताही अंतिम निर्णय झालेला नाही.''

Asia XI - लोकेश राहुल *, रिषभ पंत, विराट कोहली*, शिखर धवन, मोहम्मद शमी, कुलदीप यादव, लिटन दास, टी इक्बाल, मुश्फीकर रहीम, थिसारा परेरा, रशीद खान, मुस्ताफीजून रहमान, संदीप लामिछाने, लसिथ मलिंगा, मुजीब उर रेहमान 
 

अन्य महत्त्वाच्या बातम्या

Mumbai Indiansच्या अष्टपैलू खेळाडूला दुखापत, ट्वेंटी-२० लीगमधून माघार

'काचेच्या घरात राहणाऱ्यांनी दिवे लावून कपडे बदलू नये', आकाश चोप्रानं पाक चाहत्याला सुनावलं!

Web Title: Asia XI vs World XI match in doubtful, say BCB official svg

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.