Krunal Pandya: क्रुणाल पांड्याच्या घरी नव्या पाहुण्याचं आगमन; जाणून घ्या काय ठेवलं नाव 

भारतीय संघाचा ऑलराउंडर खेळाडू क्रुणाल पांड्या आणि पंखुडी शर्मा यांच्या घरी एका नवीन पाहुण्याचं आगमन झाले आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2022 17:13 IST2022-07-24T15:34:41+5:302022-07-24T17:13:56+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
Krunal Pandya and his wife Pankhuri Sharma are blessed with a son and the baby has been named Kavir | Krunal Pandya: क्रुणाल पांड्याच्या घरी नव्या पाहुण्याचं आगमन; जाणून घ्या काय ठेवलं नाव 

Krunal Pandya: क्रुणाल पांड्याच्या घरी नव्या पाहुण्याचं आगमन; जाणून घ्या काय ठेवलं नाव 

नवी दिल्ली : भारतीय संघाचा ऑलराउंडर खेळाडू क्रुणाल पांड्या आणि पंखुडी शर्मा यांच्या घरी एका नवीन पाहुण्याचं आगमन झाले आहे. क्रुणाल पहिल्यांदाच पिता झाला असून त्याने ही गोड बातमी सोशल मीडियावरून दिली आहे. याशिवाय क्रुणालले आपल्या चिमुकल्या पाहुण्याचे नाव देखील जाहीर केले आहे. देशांतर्गत क्रिकेटमध्ये आणि आयपीएलमध्ये शानदार प्रदर्शन केल्यानंतर देखील क्रुणाल संघाबाहेर आहे. मात्र आता त्याने दिलेल्या या बातमीने तो पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. त्याने बाळाचे दोन फोटो शेअर केले आहेत जे सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. 

क्रुणाल पांड्याला पुत्रलाभ
क्रुणाल पांड्याने पत्नी पंखुडी शर्मा सोबत ट्विटरवर दोन फोटो शेअर केले आहेत, ज्यामध्ये त्यांचे बाळ देखील पाहायला मिळत आहे.  क्रुणालने फोटो शेअर करत 'कवीर क्रुणाल पांड्या' असे कॅप्शन लिहून बाळाचे नाव जाहीर केले आहे. क्रुणालने खास इमोजी शेअर करून त्याच्या भावना व्यक्त केल्या आहेत. 

क्रुणाल पांड्या आणि मॉडेल पंखुडी शर्मा हे २७ डिसेंबर २०१७ रोजी विवाहबंधनात अडकले होते. लग्न झाल्यानंतर जवळपास पाच वर्षांच्या कालावधीनंतर ते आई-बाबा झाले आहेत. विशेष म्हणजे क्रुणालची पत्नी पंखुडी हिला क्रिकेट पाहणे देखील आवडत नाही, मात्र ती क्रुणालचे सर्व सामने पाहते असा खुलासा क्रुणालने एका कार्यक्रमात केला होता. क्रुणालने २०१८ मध्ये टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. यानंतर त्याने १९ टी-२० आणि ५ एकदिवसीय सामने खेळले आहेत. 



 

Web Title: Krunal Pandya and his wife Pankhuri Sharma are blessed with a son and the baby has been named Kavir