कोहली माझ्याशी लग्न कर, पाकिस्तानच्या पोलिसानं विराटपुढे ठेवला लग्नाला प्रस्ताव

विराटवर अनेक मुली प्रेम करतात. मात्र, आता अशी एक बातमी आली आहे ती ऐकल्यावर तुम्हालाही धक्का बसेल.

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2017 13:57 IST2017-09-17T13:51:39+5:302017-09-17T13:57:46+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
Kohli proposes marriage proposal to Virat, wife of Pakistan, in front of Virat | कोहली माझ्याशी लग्न कर, पाकिस्तानच्या पोलिसानं विराटपुढे ठेवला लग्नाला प्रस्ताव

कोहली माझ्याशी लग्न कर, पाकिस्तानच्या पोलिसानं विराटपुढे ठेवला लग्नाला प्रस्ताव

नवी दिल्ली, दि. 17 : भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीच्या फलंदाजीचे आणि लुकचे करोडो चाहते आहेत. काही वर्षांपूर्वी विराट कोहलीसोबत लग्न करण्याची इच्छा व्यक्त व्यक्त करणारी इंग्लंडची महिला खेळाडू डॅनिअल वेट तुम्हाला आठवत असेलच. विराटवर अनेक मुली प्रेम करतात. मात्र, आता अशी एक बातमी आली आहे ती ऐकल्यावर तुम्हालाही धक्का बसेल. कारण अनेक मुलींच्या गळ्यातील ताईत असणाऱ्या विराटला चक्क एका पुरुष पोलिसानं लग्नाची मागणी घातली आहे. 

प्रपोज करणारा व्यक्ती हा पाकिस्तानमधील लाहोर येथील असल्याचं कळतयं. या पोलिसाने आपल्या हातात घेतलेला पोस्टरचा फोटो सोशल मीडियात प्रचंड व्हायरल होत आहे. हा फोटो पाकिस्तान आणि वर्ल्ड इलेव्हन यांच्यातील टी-20 सामन्यावेळचा आहे. शेवटची मॅच 15 सप्टेंबरला लाहोरमधील गद्दाफी स्टेडियममध्ये खेळण्यात आली. वर्ल्ड इलेव्हन टीममध्ये एकही भारतीय प्लेयर नसताना पाकिस्तान क्रिकेट प्रेमींच्या हातात विराट आणि धोनीच्या नावाचे पोस्टर झळकत होते. यापैकीच एक पोस्टर सोशल मीडियात व्हायरल झाले आहे.
व्हायरल झालेल्या फोटोत लाहौरमधील एक पोलीस कर्मचारी पोस्टर घेऊन उभा दिसत आहे. या पोस्टरवर लिहीलं आहे की, कोहली माझ्यासोबत लग्न कर. अशा प्रकारचे पोस्टर्स अनेकदा पाहिले आहेत मात्र, आता एका पुरुषाच्या हातात प्रपोजलचं पोस्टर दिसल्याने त्यावर अनेक कमेंट्स येत आहेत. 

या पोस्टरसंदर्भात माहिती मिळू शकलेली नाहीये की, हा पोस्टर त्या पोलीस कर्मचाऱ्याचाच आहे की त्याने इतर कुणाचा पोस्टर हातात घेतला आहे. काही युजर्सच्या मते, काहींनी मस्करी करत हा पोस्टर पोलिसाकडे दिला आणि मग फोटो क्लिक केला. 


पाकिस्तानी मॉडेल कंदील बलौचनं टी20 विश्वचषकात भारतानं पाकचा पराभव केल्यानंतर विराटनं अनुष्काला सोडण्याची मागणी केली होती. त्याचा एक व्हिडिओही तिनं तयार केला होता. त्यात ती म्हणाली होती की, विराट तुम मेरे लिए अनुष्का को छोड़ दो और मेरे बारे में सोचो. 


Web Title: Kohli proposes marriage proposal to Virat, wife of Pakistan, in front of Virat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.