कसोटी मालिकेनंतर शुभमन गिल दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या ३ सामन्यांच्या वनडे मालिकेलाही मुकण्याची शक्यता आहे. ३० नोव्हेंबरपासून रांचीच्या मैदानात भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील वनडे मालिकेला सुरुवात होणार आहे. या मालिकेसाठी भारतीय संघाचे नेतृत्व कोण करणार? यासंदर्भातील चर्चा रंगताना दिसत आहे. कसोटीत शुभमन गिलच्या जागी रिषभ पंतकडे कॅप्टन्सी आली. आता वनडेत लोकेश राहुल शुभमन गिलची जागा घेताना दिसू शकेल.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
कर्णधार-उप कर्णधार दोघेही दुखापतग्रस्त
पीटीआयच्या वृत्तानुसार, शुभमन गिलची मानेची दुखापत किरकोळ नसून यातून सावरण्यासाठी त्याला आणखी वेळ लागू शकतो. त्यामुळेच निवडकर्ते आगामी वनडे मालिकेसाठी त्याच्या जागी नव्या कर्णधाराची निवड करण्याचा विचार करत आहेत. ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील वनडे मालिकेत शुभमन गिलनं रोहित शर्माची जागा घेतली होती. रोहित वनडेत सक्रीय असताना शुभमन गिलकडे संघाचे नेतृत्व देण्यात आले. या मालिकेत भारतीय संघाला २-१ अशा पराभवाचा सामना करावा लागला होता. गिलच्या नेतृत्वाखालील संघात श्रेयस अय्यरकडे उप कर्णधारपदाची जबाबदारी सोपवण्यात आली होती. तोही ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील वनडेत दुखापतग्रस्त झाल्यामुळे संघाबाहेर आहे.
VIDEO : तिकडं स्टार्कचा अप्रतिम फ्लाइंग कॅच; इकडं नेटकऱ्यांनी KL राहुलची उडवली खिल्ली; कारण...
दोन वर्षांनी KL राहुल पुन्हा होणार टीम इंडियाचा कर्णधार
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वनडे मालिकेत पुन्हा एकदा लोकेश राहुलकडे भारतीय संघाचे नेतृत्व सोपवण्यात येणार आहे. याआधी २०२३ मध्ये त्याने दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर भारतीय संघाचे नेतृत्व केले होते. लोकेश राहुल याने आतापर्यंत १२ एकदिवसीय सामन्यांमध्ये भारतीय संघाचे नेतृत्व केले आहे. त्याच्या कॅप्टन्सीत भारतीय संघाने ६६ विनिंग पर्सेंटेजसह ८ सामन्यात विजय नोंदवला आहे. या आकडेवारीमुळे तो पंतपेक्षा उत्तम पर्याय ठरतो.
रोहित शर्मासह विराट कोहली पुन्हा मैदानात उतरणार
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वनडे मालिकेत रोहित शर्मा आणि विराट कोहली ही जोडी पुन्हा एकदा मैदानात उतरल्याचे पाहायला मिळेल. ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील अखेरच्या सामन्यात या दोघांनी धमाकेदार खेळी केली होती. दोघेही आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये फक्त वनडे खेळत असल्यामुळे त्यांच्यासमोर कामगिरीतील सातत्य कायम असल्याचे दाखवून देण्याचे चॅलेंज असेल.