नवी दिल्ली : तसा भारतीय क्रिकेटपटू आणि बॉलिवूडच्या अभिनेत्रींचा संबंध भारतीयांसाठी नवीन नाही. कॅप्टन विराट कोहली-अनुष्का शर्मा, जहीर खान-सागरिका घाटगे अशी कितीतरी नावे आहेत. यामध्ये आता भारतीय संघाचा आघाडीचा फलंदाज के एल राहुल याच्या नावाचा समावेश झाला आहे. राहुलचा शनिवारीच वाढदिवस झाला. यावेळी एका बॉलिवूड अभिनेत्रीने त्याच्यासोबतच्या प्रेमसंबंधांची कबुली दिली आहे.
ही अभिनेत्री दुसरी कोणी नसून ती आहे अथिया शेट्टी. तिने प्रेमाची कबुली देत राहुलला त्याच्या २८ व्या वाढदिवशी खास भेट दिली आहे. राहुलच्या वाढदिवशी अथिया शेट्टीने तिचा आणि राहुलचा फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे. या सुंदर फोटोसोबत अथियाने तिच्या मनातील भावना व्यक्त केल्या आहे. "Happy birthday, my person" असे लिहिले आहे. तर त्यावर तीन हृदयाची इमोजी के एल राहुलने पोस्ट केली आहे.
या फोटोनंतर त्यांच्यातील लव्ह केमिस्ट्रीची चर्चा रंगू लागली होती.