के एल राहुल माझ्या प्रेमात आकंठ बुडालाय! 'या' बॉलिवूड अभिनेत्रीने दिली कबुली

राहुलचा शनिवारीच वाढदिवस झाला. यावेळी एका बॉलिवूड अभिनेत्रीने त्याच्यासोबतच्या प्रेमसंबंधांची कबुली दिली आहे. 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2020 13:48 IST2020-04-19T13:46:11+5:302020-04-19T13:48:12+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
KL Rahul is deeply in love with me! Bollywood actress Athiya Shetty confesses hrb | के एल राहुल माझ्या प्रेमात आकंठ बुडालाय! 'या' बॉलिवूड अभिनेत्रीने दिली कबुली

के एल राहुल माझ्या प्रेमात आकंठ बुडालाय! 'या' बॉलिवूड अभिनेत्रीने दिली कबुली

नवी दिल्ली : तसा भारतीय क्रिकेटपटू आणि बॉलिवूडच्या अभिनेत्रींचा संबंध भारतीयांसाठी नवीन नाही. कॅप्टन विराट कोहली-अनुष्का शर्मा, जहीर खान-सागरिका घाटगे अशी कितीतरी नावे आहेत. यामध्ये आता भारतीय संघाचा आघाडीचा फलंदाज के एल राहुल याच्या नावाचा समावेश झाला आहे. राहुलचा शनिवारीच वाढदिवस झाला. यावेळी एका बॉलिवूड अभिनेत्रीने त्याच्यासोबतच्या प्रेमसंबंधांची कबुली दिली आहे. 


ही अभिनेत्री दुसरी कोणी नसून ती आहे अथिया शेट्टी. तिने प्रेमाची कबुली देत राहुलला त्याच्या २८ व्या वाढदिवशी खास भेट दिली आहे. राहुलच्या वाढदिवशी अथिया शेट्टीने तिचा आणि राहुलचा फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे. या सुंदर फोटोसोबत अथियाने तिच्या मनातील भावना व्यक्त केल्या आहे. "Happy birthday, my person" असे लिहिले आहे. तर त्यावर तीन हृदयाची इमोजी के एल राहुलने पोस्ट केली आहे. 


दोन्ही स्टारनी एकमेकांसोबतचे फोटो पोस्ट केल्याची पहिलीच वेळ नाहीय. पण प्रेमाची कबुली देण्याची ही पहिलीच वेळ आहे. दोघांनीही या आधी अनेकदा एकमेकांसोबतचे फोटो त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्रामवर पोस्ट केले आहेत. अद्याप दोघांपैकी कोणीही अधिकृतरित्या त्यांच्या अफेअरबाबत बोललेले नाहीय. मात्र, अथियाच्या पोस्टवर राहुलने केलेली पोस्ट सारे काही सांगून जात आहे. 


या फोटोनंतर त्यांच्यातील लव्ह केमिस्ट्रीची चर्चा रंगू लागली होती.

Web Title: KL Rahul is deeply in love with me! Bollywood actress Athiya Shetty confesses hrb

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.