नो बॉल ट्विस्ट; फक्त १२ मिनिटांचं अंतर! KL Rahul अन् Kane Williamson यांच्यात सेम टू सेम सीन (VIDEO)

वेगवेगळ्या कसोटी सामन्यात सेम टू सेम सीन पाहायला मिळाला. अन् जुळून आला कमालीचा योगायोग

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2024 14:19 IST2024-12-06T14:10:33+5:302024-12-06T14:19:33+5:30

whatsapp join usJoin us
Kl Rahul And Kane Williamson Same To Same Seen Both Survives On No Ball After Getting Out In Adelaide And Wellington Test | नो बॉल ट्विस्ट; फक्त १२ मिनिटांचं अंतर! KL Rahul अन् Kane Williamson यांच्यात सेम टू सेम सीन (VIDEO)

नो बॉल ट्विस्ट; फक्त १२ मिनिटांचं अंतर! KL Rahul अन् Kane Williamson यांच्यात सेम टू सेम सीन (VIDEO)

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

Kl Rahul And Kane Williamson Same To Same Seen Both Survives On No Ball : भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसरा कसोटी सामना अ‍ॅडिलेडच्या मैदानात सुरु आहे. या सामन्यात लोकेश राहुलला नो बॉलवर जीवनदान मिळाल्याचा सीन पाहायला मिळाला. दुसरीकडे अगदी हाच सीन न्यूझीलंड आणि इंग्लंड यांच्यातील  वेलिंग्टन कसोटी सामन्यातही पाहायला मिळाला. तिकडे बॅटर होता केन विलियम्सन. वेगवेगळ्या कसोटी सामन्यात सेम टू सेम सीन पाहायला मिळाला. इथं ही स्टोरी संपत नाही. यापुढे दोघांच्या बाबतीत कमालीचा योगायोगही पाहायला मिळाला. जाणून घेऊयात त्यासंदर्भातील खास स्टोरी

आउट झाल्यावर लोकेश राहुलनं मैदान सोडलं होतं पण नो बॉलमुळे आलं ट्विस्ट 

वेगवेगळ्या मैदानात सुरु असलेल्या  कसोटी सामन्यात अगदी सेम टू सेम सीन घडल्याचे फार कमी वेळा पाहायला मिळते. लोकेश राहुल आणि केन विलियम्सन यांच्या बाबतीत जे घडलं ते तर याआधी कधीच पाहायला मिळालेले नाही. अ‍ॅडिलेडच्या मैदानात रंगलेल्या सामन्यात लोकेश राहुलनं यशस्वी जैस्वालच्या सानं टीम इंडियाच्या डावाची सुरुवात केली. तो चांगला लयीतही दिसला. पण स्कॉट बोलंडच्या गोलंदाजीवर एका बाहेर जाणाऱ्या चेंडू मारण्याच्या नादात तो फसला.

किंग कोहली क्रिजमध्ये येण्याऐवजी पॅव्हेलियनमध्ये परतला

विकेटमागे किपरनं कॅच घेतल्यावर लोकेश राहुलनं तंबूचाही रस्ता धरला होता. दुसरीकडे विराट कोहली पॅव्हेलियनमधून क्रिजमध्ये येण्यासाठी तयार होता. पण मैदानातील पंचांनी नो बॉल असल्याचा इशारा केला अन् केएल राहुलला जीवनदान मिळाले. भारतीय प्रमाणवेळेनुसार १० वाजून १२ मिनिटांनी हा सीन पाहायला मिळाला. 

सेम टू सेम सीन! आधी केन विलियम्सनच्या बाबतीत घडला

याआधी १२ मिनिटे आधी वेलिंग्टनच्या मैदानात केन विलियम्सनच्या बाबतीत अगदी असेच घडलं. केन विलियम्सन याने ब्रेडन कार्स याच्या  गोलंदाजीवर आउट झाला. पण नो बॉल असल्यामुळे त्याला जीवनदान मिळाले. कमालीची गोष्ट ही की इंग्लंड विरुद्धच्या कसोटी सामन्यात जीवदान मिळाल्यावर केनची इनिंग ३७ धावांवर संपली. पिंक बॉल टेस्टमध्ये लोकेश राहुलही तेवढ्याच धावा करून तंबूत परतला. फरक फक्त एवढाच की, लोकेश राहुलनं ६४ चेंडूचा सामना केला आणि केन ५६ चेंडू खेळून बाद झाला. 
 

Web Title: Kl Rahul And Kane Williamson Same To Same Seen Both Survives On No Ball After Getting Out In Adelaide And Wellington Test

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.