Join us  

KKR vs SRH Latest News : डेव्हिड वॉर्नरनं IPL 2020मधील परंपरा मोडली अन् KKRनं वर्चस्व गाजवलं

KKR vs SRH Latest News :  पहिल्या टप्प्यात KKRचा कर्णधार दिनेश कार्तिकच्या कल्पक नेतृत्वानं बाजी मारली.

By स्वदेश घाणेकर | Published: September 26, 2020 9:18 PM

Open in App
ठळक मुद्देमनीष पांडेची अर्धशतकी खेळी, डेव्हिड वॉर्नर अन् वृद्धीमान सहाच्या उपयुक्त धावापॅट कमिन्स, वरुण चक्रवर्थी, आंद्रे रसेल यांना प्रत्येकी एक विकेट

KKR vs SRH Latest News :  Indian Premier League ( IPL 2020) आजच्या सामन्यात सनरायझर्स हैदराबाद ( Sunrisers Hyderabad) आणि कोलकाता नाइट रायडर्स ( Kolkata Knight Riders) भिडत आहेत. दोन्ही संघांना पहिल्या सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यामुळे पहिल्या सामन्यातील चुका सुधारून आज दोन्ही संघ विजयाची चव चाखण्यासाठी मैदानावर उतरले. पण, पहिल्या टप्प्यात KKRचा कर्णधार दिनेश कार्तिकच्या कल्पक नेतृत्वानं बाजी मारली. उपयुक्त गोलंदाजांचा सुरेख वापर अन् उत्तम क्षेत्ररक्षण लावताना कार्तिकनं SRHच्या धावांवर लगाम लावण्यात यश मिळवलं. KKR vs SRH Latest News & Live Score 

IPL पाहताना रडायचा, राहुल द्रविडनं आत्मविश्वास वाढवला अन् आज KKRकडून केलं पदार्पण  

'फॅफ'ब्यूलस कॅच, KL राहुलचे शतक अन् MS Dhoniचे चुकलेले डावपेच; कसा राहिला IPL 2020 चा पहिला आठवडा, Video

IPL 2020तील आतापर्यं झालेल्या 7 सामन्यात नाणेफेक जिंकलेल्या कर्णधारानं प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. पण, आजचा सामना त्याला अपवाद ठरला. SRHचा कर्णधार डेव्हिड वॉर्नर ( David Warner) याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. त्याचा निर्णय SRHला महागात पडला. जॉनी बेअरस्टो ( Jonny Bairstow) आणि डेव्हिड वॉर्नर ( David Warner) यांनी SRHला सावध सुरुवात करून दिली. मागील सामन्यात महागडा ठरलेल्या पॅट कमनिन्सनं ( Pat Cummins) चौथ्या षटकात KKRला पहिले यश मिळवून दिले. चौथ्या षटकाच्या पाचव्या चेंडूवर पंचांनी बेअरस्टोला झेलबाद दिले, परंतु DRSमध्ये तो नाबाद असल्याचे समोर आले. मात्र, पुढच्याच चेंडूवर कमिन्सने त्याचा त्रिफळा उडवला. KKR vs SRH Latest News & Live Score

वॉर्नर आणि मनीष पांडे यांनी दमदार खेळ करताना SRHचा डाव सावरला. दिनेश कार्तिकच्या फिल्ड प्लेसमेंटनं आज सर्वांची वाहवाह मिळवली. पण, 10व्या षटकात वॉर्नरचा झंझावात रोखण्यात KKRला यश आलं. वरुण चक्रवतीनं त्याच्याच गोलंदाजीवर वॉर्नरला झेलबाद करून माघारी पाठवले. वॉर्नरने 30 चेंडूंत 36 धावा केल्या. आजच्या सामन्यात दिनेश कार्तिकनं ज्या पद्धतीनं त्याच्या गोलंदाजांचा उपयोग केला, ते पाहून सर्वच कौतुक करत होते. शिवाय त्यानं लावलेल्या क्षेत्ररक्षणामुळे SRHच्या फलंदाजांना धाव घेण्यासाठी संघर्ष करावा लागत होता. 15व्या षटकात SRHने 100 धावांचा टप्पा गाठला. KKR vs SRH Latest News & Live Score

वृद्धीमान सहा ( Wriddhiman Saha ) आणि मनीष पांडे ( Manish Pandey ) यांनी तिसऱ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी करताना SRHला समाधानकारक पल्ला गाठण्याच्या दिशेनं कूच करून दिली. मनीषनं 35 चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले. आंद्रे रसेलनं ( Andre Russell) ही भागीदारी संपुष्टात आणली. 18व्या षटकात मनीष पांडे 38 चेंडूंत 51 धावा ( 3 चौकार व 2 षटकार) करून माघारी परतला. सहा 30 धावांवर रन आऊट झाला. SRHला 20 षटकांत 4  बाद 142 धावांपर्यंतच मजल मारता आली. 

अन्य महत्त्वाच्या बातम्या

"बुलेट ट्रेन येईल, पण MS Dhoni चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला येणार नाही; मोदी जी आता तुम्हीच समजवा"

IPL 2020 : CSKचे बुडते जहाज वाचवण्यासाठी सुरेश रैना कमबॅक करणार? फ्रँचायझीने दिले महत्त्वाचे अपडेट्स

इंडियन प्रीमिअर लीग की Injury Premier League? आतापर्यंत 8 खेळाडू झाले दुखापतग्रस्त! 

CSK vs DC सामन्यात 'तिने' सर्वांचे लक्ष वेधले, नेटिझन्स सर्च इंजिनवर तुटून पडले

हे अति झालं, असं तुम्हाला वाटत नाही का? सुनील गावस्कर यांच्या कमेंटवर झरीन खान भडकली

- KKRविरुद्धच्या सामन्याला रवाना होण्यापूर्वी जॉनी बेअरस्टोनं सहकाऱ्यांसोबत साजरा केला बर्थ डे! 

टॅग्स :IPL 2020सनरायझर्स हैदराबादकोलकाता नाईट रायडर्स