KKR vs SRH Latest News : KKRविरुद्धच्या सामन्याला रवाना होण्यापूर्वी जॉनी बेअरस्टोनं सहकाऱ्यांसोबत साजरा केला बर्थ डे! 

KKR vs SRH Latest News :पहिल्या सामन्यातील चुका सुधारून आज दोन्ही संघ विजयाची चव चाखण्यासाठी मैदानावर उतरणार आहेत.

By स्वदेश घाणेकर | Published: September 26, 2020 06:18 PM2020-09-26T18:18:03+5:302020-09-26T18:18:24+5:30

whatsapp join usJoin us
KKR vs SRH Latest News : Jonny Bairstow celebrates birthday with Sunrisers Hyderabad teammates before leaving for the match, Video | KKR vs SRH Latest News : KKRविरुद्धच्या सामन्याला रवाना होण्यापूर्वी जॉनी बेअरस्टोनं सहकाऱ्यांसोबत साजरा केला बर्थ डे! 

KKR vs SRH Latest News : KKRविरुद्धच्या सामन्याला रवाना होण्यापूर्वी जॉनी बेअरस्टोनं सहकाऱ्यांसोबत साजरा केला बर्थ डे! 

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

KKR vs SRH Latest News, IPL 2020 : Indian Premier League ( IPL 2020) आजच्या सामन्यात सनरायझर्स हैदराबाद ( Sunrisers Hyderabad) आणि कोलकाता नाइट रायडर्स ( Kolkata Knight Riders) भिडणार आहेत. दोन्ही संघांना पहिल्या सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला होता. मुंबई इंडियन्सविरुद्धच्या (MI) सामन्यात KKRचा कर्णधार दिनेश कार्तिक याच्या फसलेल्या रणनीतीवर टीका झाली होती. दुसरीकडे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू ( RCB) विरुद्धच्या सामन्यात विजयाच्या समीप येऊन SRHला पराभव पत्करावा लागला होता. त्यामुळे पहिल्या सामन्यातील चुका सुधारून आज दोन्ही संघ विजयाची चव चाखण्यासाठी मैदानावर उतरणार आहेत. KKRविरुद्ध मैदानावर उतरण्यापूर्वी SRHच्या सहकाऱ्यांनी सलामीवीर जॉनी बेअरस्टो ( Jonny Bairstow) याचा वाढदिवस दणक्यात साजरा केला.  KKR vs SRH Latest News & Live Score

वेदर रिपोर्ट । दिवसाचे तापमान ३७ डिग्री सेल्सियसच्या आसपास राहण्याची शक्यता, पण ह्युमिडिटी ५६ टक्के असू शकते. हवेचा वेग १८ किलोमीटर प्रतितास राहण्याची शक्यता.

पिच रिपोर्ट । या लढतीतही खेळपट्टी गोलंदाजांना अनुकूल राहील, पण फलंदाज स्थिरावले तर धावा होऊ शकतात.

मजबूत बाजू
कोलकाता। सुनील नारायणसारखा जागतिक दर्जाचा गोलंदाज आणि रसेल व मॉर्गन यांच्यासारखे फलंदाज संघात आहेत.
हैदराबाद । डेव्हिड वॉर्नर सलामीवीर व कर्णधार. केन विलियम्सनने पुनरागमन केले तर मधली फळी मजबूत. गोलंदाजी प्रभावशली. राशिद खान व भुवनेश्वर कुमार यांची उपस्थिती. राशिदच्या साथीला नबीला संधी मिळू शकते.

कमजोर बाजू
कोलकाता । कर्णधार दिनेश कार्तिक निर्णय घेण्याच्या क्षमतेत कमकुवत. फलंदाजी क्रमामध्येही अनेक उणिवा. गेल्या लढतीत रसेल व मॉर्गन यांना खालच्या स्थानावर फलंदाजीची संधी. नारायणलाही उशिरा गोलंदाजीला पाचारण.
हैदराबाद । मधली फळी ढेपाळणे. अष्टपैलू मिशेल मार्शची स्पर्धेतून माघार. 
SRH vs KKR Head To Head
एकूण सामने - 17
कोलकाता नाइट रायडर्स  - 10
सनरायझर्स हैदराबाद - 7 
 
भुवनेश्वर कुमारने ( Bhuvneshwar Kumar) KKRविरुद्ध 20 सामन्यांत सर्वाधिक 27 विकेट्स घेतल्या आहेत.  
डेव्हिड वॉर्नरने ( David Warner) KKRविरुद्ध 21 डावांत 43.63 च्या सरासीनं 829 धावा चोपल्या आहेत. त्यात दोन शतकं व 4 अर्धशतकांचा समावेश आहे.

अन्य महत्त्वाच्या बातम्या

"बुलेट ट्रेन येईल, पण MS Dhoni चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला येणार नाही; मोदी जी आता तुम्हीच समजवा"

IPL 2020 : CSKचे बुडते जहाज वाचवण्यासाठी सुरेश रैना कमबॅक करणार? फ्रँचायझीने दिले महत्त्वाचे अपडेट्स

इंडियन प्रीमिअर लीग की Injury Premier League? आतापर्यंत 8 खेळाडू झाले दुखापतग्रस्त! 

CSK vs DC सामन्यात 'तिने' सर्वांचे लक्ष वेधले, नेटिझन्स सर्च इंजिनवर तुटून पडले

हे अति झालं, असं तुम्हाला वाटत नाही का? सुनील गावस्कर यांच्या कमेंटवर झरीन खान भडकली

Web Title: KKR vs SRH Latest News : Jonny Bairstow celebrates birthday with Sunrisers Hyderabad teammates before leaving for the match, Video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.