Zareen Khan Slams Sunil Gavaskar For His 'distasteful' Comment Against Anushka Sharma | हे अति झालं, असं तुम्हाला वाटत नाही का? सुनील गावस्कर यांच्या कमेंटवर झरीन खान भडकली

हे अति झालं, असं तुम्हाला वाटत नाही का? सुनील गावस्कर यांच्या कमेंटवर झरीन खान भडकली

किंग्स इलेव्हन पंजाब ( Kings XI Punjab) आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू ( Royal Challengers Bangalore) यांच्यात झालेल्या सामन्यात चर्चा रंगलीत ती सुनील गावस्कर ( Sunil Gavaskar) यांच्या कॉमेंट्रीची... विराट कोहली ( Virat Kohli) फलंदाजी करताना गावस्कर यांनी लॉकडाऊन काळातील विराट-अनुष्का शर्माच्या एका व्हिडीओवरून कमेंट केली आणि नेटिझन्सनी त्याचा चुकीचा अर्थ लावून माजी क्रिकेटपटूवर टीका केली. नेटिझन्सच्या या टीकेनंतर विराटची पत्नी अनुष्का शर्मा ( Anushka Sharma) हीनं इस्टाग्रावर एक मोठी पोस्ट लिहून गावस्कर यांच्यावर टीका केली. त्यात आता बॉलिवूड अभिनेत्री झरीन खान हिनं भारताच्या महान क्रिकेटपटूवर टीका केली. 

"बुलेट ट्रेन येईल, पण MS Dhoni चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला येणार नाही; मोदी जी आता तुम्हीच समजवा"

IPL 2020 : CSKचे बुडते जहाज वाचवण्यासाठी सुरेश रैना कमबॅक करणार? फ्रँचायझीने दिले महत्त्वाचे अपडेट्स

सुनील गावस्कर यांचे अनुष्काला प्रत्युत्तर
अनुष्का शर्माला उत्तर देताना गावस्करांनी काही प्रश्न विचारले. ते म्हणाले,''मी कुठे तिच्यावर टीका केली? मी कोणती आक्षेपार्ह भाष्य केले? लॉकडाऊनच्या काळात विराट-अनुष्काच्या शेजारील इमारतीवरून कोणतरी व्हिडीओ रिकॉर्ड केला आणि मी त्याबाबतच बोलत होतो. लॉकडाऊनच्या काळात विराटला क्रिकेटचा सराव करता आला नाही. फक्त त्याचा अनुष्कासोबतचा इमारतीच्या टेरेसवर क्रिकेट खेळतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्यात अनुष्का त्याला गोलंदाजी करत होती. तेच तर मी म्हणालो.'' 

''विराटच्या अपयशाला मी अनुष्काला कुठे जबाबदार ठरवले? त्या व्हिडीओत अनुष्काने गोलंदाजी केली, हेच मी म्हणालो,''असेही गावस्कर यांनी सांगितले.

इंडियन प्रीमिअर लीग की Injury Premier League? आतापर्यंत 8 खेळाडू झाले दुखापतग्रस्त! 

CSK vs DC सामन्यात 'तिने' सर्वांचे लक्ष वेधले, नेटिझन्स सर्च इंजिनवर तुटून पडले

'It’s high time, झरीन खान हिची टीका 
सुनील गावस्कर यांच्या कमेंटवरून उगाच वाद सुरू झाल्यानंतर Housefull 2 ची अभिनेत्री झरीन खान हिनंही पोस्ट लिहिली. ''Mr. सुनील गावस्कर, तुम्ही दिग्गज क्रिकेटपटू आहात आणि विराट कोहली व त्याच्या पत्नीबद्दल असं विधान तुम्हाला शोभा देत नाही. तुम्हीही ऐकेकाळी क्रिकेट खेळायचा आणि खेळात प्रत्येक दिवस चांगला नसतो, हे तुम्हालाही चांगले माहित आहे.''

सुनील गावस्कर नेमकं काय म्हणाले?
हिंदीत समालोचन करताना गावस्कर यांनी विराटच्या निराशाजनक कामगिरीवर म्हटले की,''विराटनं लॉकडाऊनमध्ये फक्त अनुष्काच्या गोलंदाजीवर सराव केला.'' लॉकडाऊनमध्ये विराट-अनुष्काचा क्रिकेट खेळतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्याचा संदर्भ देऊन गावस्कर यांनी हे विधान केलं होतं. परंतु त्यांच्या या विधानानं चाहते चांगलेच भडकले आहेत.

अनुष्का शर्माची भलीमोठी पोस्ट
सुनील गावस्कर ( Sunil Gavaskar) यांच्या विधानावर अनुष्का शर्मानं भली मोठी पोस्ट लिहिली. विराट कोहलीच्या कामगिरीवरून स्वतःचं नाव खेचल्यानं अनुष्का नाराज झाली. तिनं लिहिलं की,''तुम्ही केलेली कमेंट त्रासदायक आहे, परंतु पतीच्या कामगिरीवर पत्नीला जबाबदार धरण्याचं विधान का केलंत, याचं उत्तर मला द्यायला आवडेल. गेली अनेक वर्ष एखाद्या क्रिकेटपटूच्या कामगिरीवर प्रतिक्रिया देताना तुम्ही त्याच्या खाजगी आयुष्याचा आदर केला असेलच, याची मला खात्री आहे. मग, तुम्हाला असं वाटत नाही का आम्हालाही तसाच समान आदर मिळायला हवा? माझ्या पतीच्या कामगिरीवर प्रतिक्रिया देताना तुमच्या डोक्यात शब्दांचा भंडार नक्कीच होता किंवा तुमचं ते विधान माझ्या नावाशिवाय पूर्ण होऊ शकत नव्हतं का?''

''2020वर्ष आलं, परंतु माझ्यासाठी काहीच बदललेलं नाही. माझं नाव क्रिकेटमध्ये ओढणं कधी थांबेल आणि अशा कमेंट कधी थांबतील? गावस्कर तुम्ही या जंटलमन्स खेळाचे दिग्गज खेळाडू आहात. तुम्हाला फक्त एवढंच सांगायचंय की, तुमच्या विधानानं दुःख झाले,''असेही अनुष्का म्हणाली.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Zareen Khan Slams Sunil Gavaskar For His 'distasteful' Comment Against Anushka Sharma

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.