IPL पाहताना रडायचा, राहुल द्रविडनं आत्मविश्वास वाढवला अन् आज KKRकडून केलं पदार्पण

KKR vs SRH Latest News :  Indian Premier League ( IPL 2020) आजच्या सामन्यात सनरायझर्स हैदराबाद ( Sunrisers Hyderabad) आणि कोलकाता नाइट रायडर्स ( Kolkata Knight Riders) भिडणार आहेत.

By स्वदेश घाणेकर | Published: September 26, 2020 08:28 PM2020-09-26T20:28:38+5:302020-09-26T20:29:57+5:30

whatsapp join usJoin us
KKR vs SRH Latest News : Kamlesh Nagarkoti makes his IPL debut, he missed two seasons due to injuries | IPL पाहताना रडायचा, राहुल द्रविडनं आत्मविश्वास वाढवला अन् आज KKRकडून केलं पदार्पण

IPL पाहताना रडायचा, राहुल द्रविडनं आत्मविश्वास वाढवला अन् आज KKRकडून केलं पदार्पण

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

KKR vs SRH Latest News :  Indian Premier League ( IPL 2020) आजच्या सामन्यात सनरायझर्स हैदराबाद ( Sunrisers Hyderabad) आणि कोलकाता नाइट रायडर्स ( Kolkata Knight Riders) भिडणार आहेत. दोन्ही संघांना पहिल्या सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला होता. मुंबई इंडियन्सविरुद्धच्या (MI) सामन्यात KKRचा कर्णधार दिनेश कार्तिक याच्या फसलेल्या रणनीतीवर टीका झाली होती. दुसरीकडे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू ( RCB) विरुद्धच्या सामन्यात विजयाच्या समीप येऊन SRHला पराभव पत्करावा लागला होता. त्यामुळे पहिल्या सामन्यातील चुका सुधारून आज दोन्ही संघ विजयाची चव चाखण्यासाठी मैदानावर उतरले आहेत. आजच्या सामन्यात KKR ने कमलेश नागरकोटी ( Kamlesh Nagarkoti)ला पदार्पणाची संधी दिली. KKR vs SRH Latest News & Live Score

IPL 2020तील आतापर्यं झालेल्या 7 सामन्यात नाणेफेक जिंकलेल्या कर्णधारानं प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. पण, आजचा सामना त्याला अपवाद ठरला. SRHचा कर्णधार डेव्हिड वॉर्नर ( David Warner) याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. त्याच्या या निर्णयानं सर्वांना धक्का बसला, परंतु आव्हानासाठी सज्ज असल्याचे वॉर्नरने स्पष्ट केले. KKR vs SRH Latest News & Live Score

कमलेश नागरकोटीचे पदार्पण
2018च्या युवा वर्ल्ड कप स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात बांगलादेशविरुद्ध 18 धावांत 3 महत्त्वाच्या विकेट घेणाऱ्या कमलेश नागरकोटीलने आज IPLमध्ये पदार्पण केले. 2018च्या लिलावात KKRने त्याला 3.2 कोटींत आपल्या ताफ्यात दाखल करून घेतले होते, परंतु दुखापतीमुळे त्याला दोन मोसमात खेळता आले नाही. 14 फेब्रुवारी 2018मध्ये तो अखेरचा लिस्ट ए सामना खेळला होता.  

कमलेशला 19 महिने क्रिकेटपासून दूर रहावं लागलं. त्याच्या पाठीच्या खालच्या बाजूला, गुडघा व टाचेला दुखापत झाली होती. त्यानंतर त्याला बंगळुरू येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत पाठवण्यात आले. कमलेश उपचार घेत होता, तेव्हा त्याचे सहकारी शुबमन गिल, अभिषेश वर्मा आयपीएल खेळत होते. दुखापतीमुळे कमलेशमध्ये नकारात्मक भावना निर्माण झाली होती, परंतु भारताचा महान फलंदाज राहुल द्रविडनं त्याची मदत केली. राहुल द्रविडच्या देखरेखीखाली कमलेश उपचार घेत होता आणि त्यावेळी द्रविडनं सांगितलेल्या अनमोल शब्दांनी त्याची नकारात्मकता दूर केली. 

20 वर्षीय कमलेशनं राजस्थानकडून 9 लिस्ट ए सामन्यांत 11 विकेट्स घेतले. न्यूझीलंडमध्ये 2018 झालेल्या 19 वर्षांखालील वर्ल्ड कप स्पर्धेत त्यानं 6 सामन्यांत 9 विकेट्स घेतल्या होत्या आणि त्यानं भारताला जेतेपद मिळवून देण्यात महत्त्वाचा वाटा उचलला होता.

अन्य महत्त्वाच्या बातम्या

"बुलेट ट्रेन येईल, पण MS Dhoni चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला येणार नाही; मोदी जी आता तुम्हीच समजवा"

IPL 2020 : CSKचे बुडते जहाज वाचवण्यासाठी सुरेश रैना कमबॅक करणार? फ्रँचायझीने दिले महत्त्वाचे अपडेट्स

इंडियन प्रीमिअर लीग की Injury Premier League? आतापर्यंत 8 खेळाडू झाले दुखापतग्रस्त! 

CSK vs DC सामन्यात 'तिने' सर्वांचे लक्ष वेधले, नेटिझन्स सर्च इंजिनवर तुटून पडले

हे अति झालं, असं तुम्हाला वाटत नाही का? सुनील गावस्कर यांच्या कमेंटवर झरीन खान भडकली

- KKRविरुद्धच्या सामन्याला रवाना होण्यापूर्वी जॉनी बेअरस्टोनं सहकाऱ्यांसोबत साजरा केला बर्थ डे! 

 

जॉनी बेअरस्टो ( Jonny Bairstow) आणि डेव्हिड वॉर्नर ( David Warner) यांनी SRHला सावध सुरुवात करून दिली. मागील सामन्यात महागडा ठरलेल्या पॅट कमनिन्सनं ( Pat Cummins) चौथ्या षटकात KKRला पहिले यश मिळवून दिले. चौथ्या षटकाच्या पाचव्या चेंडूवर पंचांनी बेअरस्टोला झेलबाद दिले, परंतु DRSमध्ये तो नाबाद असल्याचे समोर आले. मात्र, पुढच्याच षटकात कमिन्सने त्याचा त्रिफळा उडवला. वॉर्नर आणि मनीष पांडे यांनी दमदार खेळ करताना SRHचा डाव सावरला. दिनेश कार्तिकच्या फिल्ड प्लेसमेंटनं आज सर्वांची वाहवाह मिळवली. पण, 10व्या षटकात वॉर्नरचा झंझावात रोखण्यात KKRला यश आलं. वरुण चक्रवतीनं त्याच्याच गोलंदाजीवर वॉर्नरला झेलबाद करून माघारी पाठवले. वॉर्नरने 30 चेंडूंत 36 धावा केल्या. 

सनरायझर्स हैदराबाद ( Sunrisers Hyderabad XI) : डेव्हिड वॉर्नर, मनीष पांडे, प्रियांक गर्ग, वृद्धीमान सहा, मोहम्मद नबी, रशीद खान, अभिषेक शर्मा, भुवनेश्वर कुमार, खलील अहमद, टी नटराजन.  

कोलकाता नाइट रायडर्स ( Kolkata Knight Riders XI) : शुबमन गिल, सुनील नरीन, नितिश राणा, दिनेश कार्तिक, इयॉन मॉर्गन, आंद्रे रसेल, पॅट कमिन्स, शिवम मावी, कुलदीप यादव, कमलेश नागरकोटी, वरुण चक्रवर्थी 

Web Title: KKR vs SRH Latest News : Kamlesh Nagarkoti makes his IPL debut, he missed two seasons due to injuries

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.