Rohit Sharma Shreyas Iyer, IPL 2022 MI vs KKR Live: मुंबई इंडियन्स विरूद्ध कोलकाताच्या संघात 'होलसेल' बदल; टॉसच्या वेळी रोहितलाही हसू आवरेना.. पाहा धमाल (Video)

मुंबई इंडियन्सने सूर्यकुमार यादवला बसवलं संघाबाहेर, पाहा Playing XI

By ऑनलाइन लोकमत | Published: May 9, 2022 07:56 PM2022-05-09T19:56:38+5:302022-05-09T20:01:47+5:30

whatsapp join usJoin us
KKR creates weird record Mumbai Indians against changes 5 players totals changes tally reaches to 22 Rohit Sharma Shreyas Iyer | Rohit Sharma Shreyas Iyer, IPL 2022 MI vs KKR Live: मुंबई इंडियन्स विरूद्ध कोलकाताच्या संघात 'होलसेल' बदल; टॉसच्या वेळी रोहितलाही हसू आवरेना.. पाहा धमाल (Video)

Rohit Sharma Shreyas Iyer, IPL 2022 MI vs KKR Live: मुंबई इंडियन्स विरूद्ध कोलकाताच्या संघात 'होलसेल' बदल; टॉसच्या वेळी रोहितलाही हसू आवरेना.. पाहा धमाल (Video)

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

Rohit Sharma Shreyas Iyer, Mumbai Indians vs Kolkata Knight Riders, IPL 2022 Live Updates: मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा याने कोलकाता नाईट रायडर्स संघाविरूद्धच्या सामन्यात नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. टॉसच्या वेळी रोहित शर्माने संघातील बदल सांगताना मुंबईच्या चाहत्यांना एक धक्का दिला. स्टार फलंदाज सूर्यकुमार यादव याला संघाबाहेर ठेवण्यात आले असून त्याच्या जागी रमणदीप सिंग याला संघात स्थान दिले. सूर्यकुमार हा दुखापतीमुळे संघाबाहेर असल्याचे रोहितने सांगितलं. त्यानंतर कोलकाताचा कर्णधार श्रेयस अय्यर याला संघातील बदलाबाबत विचारण्यात आले. त्यावेळी त्याने चक्क संघात ५ बदल केल्याचे सांगितले. अजिंक्य रहाणे, व्यंकटेश अय्यर, शेल्डन जॅक्सन, वरूण चक्रवर्ती आणि पॅट कमिन्स असा संघात 'होलसेल' बदल केल्याचं त्याने सांगितले. या ५ बदलांसह यंदाच्या हंगामात KKR च्या संघाने आतापर्यंत तब्बल २२ खेळाडूंना संघात बदलाच्या स्वरूपात घेतले.

--

पाहा दोन्ही संघातील ११ खेळाडूंची यादी-

कोलकाता नाइट रायडर्स-अजिंक्य रहाणे, व्यंकटेश अय्यर,श्रेयस अय्यर (क), नितीश राणा, रिंकू सिंग, आंद्रे रसेल, सुनील नरेन, शेल्डन जॅक्सन (य), पॅट कमिन्स, टिम साऊदी, वरुण चक्रवर्ती

मुंबई इंडियन्स- ईशान किशन (य), रोहित शर्मा (क), तिलक वर्मा, टिम डेव्हिड, किरॉन पोलार्ड, रमणदीप सिंग, डॅनियल सॅम्स, मुरुगन अश्विन, कुमार कार्तिकेय, जसप्रीत बुमराह, रिले मेरेडिथ

Web Title: KKR creates weird record Mumbai Indians against changes 5 players totals changes tally reaches to 22 Rohit Sharma Shreyas Iyer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.