Join us

कतरिना कैफच्या फलंदाजीवर किंग्ज इलेव्हन पंजाबची मालकीण इम्प्रेस, संघात घेण्यासाठी उत्सुक

बॉलिवूडची कॅट अर्थात कतरिना कैफचा क्रिकेट खेळतानाचा व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2019 09:17 IST

Open in App

मुंबई : बॉलिवूडची कॅट अर्थात कतरिना कैफचा क्रिकेट खेळतानाचा व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. 'भारत' या आगामी चित्रपटाच्या सेटवर क्रिकेट खेळताना कतरिनाने जोरदार फटकेबाजी केली. त्यानंतर तिने फलंदाजी करतानाची व्हिडीओ इंस्टाग्रामवर शेअर केला. तिने या पोस्टसह अनुष्का शर्मालाही एक मॅसेज पाठवला. तिने इंग्लंडमध्ये होणाऱ्या वर्ल्ड कप स्पर्धेत भारतीय संघात घेण्यासाठी कर्णधार विराट कोहलीकडे शब्द टाकण्याची विनंती केली. 

सोशल मीडियावर हा व्हिडीओ वाऱ्यासारखा पसरला आणि बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रेटींनीही कतरिनाच्या फलंदाजीचे कौतुक केले. इंडियन प्रीमिअर लीगमधील किंग्ज इलेव्हन पंजाब संघाची सह मालकीण आणि बॉलिवूड अभिनेत्री प्रिती झिंटा इम्प्रेस झाली आहे. प्रिती म्हणाली की,''आमच्या संघाकडून खेळण्यासाठी आम्ही इच्छूक आहोत.'' कतरिनानेही प्रितीच्या मॅसेजवर लगेच रिप्लाय दिला. ''कृपया करून लवकर मला तुमच्या संघाकडून खेळूद्या,'' असे कतरिना म्हणाली. 

पाहा व्हिडीओ... 

https://www.instagram.com/p/Bs7S2Jwg2Zf/?utm_source=ig_web_copy_link

आयपीएलच्या आगामी हंगामासाठी पंजाबने संघात बरेच फेरबदल केले आहे. पंजाबने युवा आणि अनुभवी खेळाडूंची योग्य सांगड घातली आहे. पंजाबच्या संघात मोईसेस हेन्रीक्स, सॅम कुरन, मोहम्मद शमी, सर्फराज खान आणि निकोलस पुरन यांचा समावेश आहे. पंजाबने वरुण चक्रवर्तीला 8.40 कोटीत करारबद्ध केले आहे. भारताचा फिरकीपटू आर अश्विन याच्याकडेच कर्णधारपदाची जबाबदारी असण्याची शक्यता आहे. 23 मार्चपासून आयपीएलच्या हंगामाला सुरुवात होणार आहे.  

टॅग्स :आयपीएल 2019किंग्ज इलेव्हन पंजाबकतरिना कैफभारत सिनेमा