Join us
Daily Top 2Weekly Top 5

Kinchit Shah Proposing Girlfriend: मॅच हरलो म्हणून काय झाले! हाँगकाँगचा शहा स्टेडिअमकडे पळाला, गर्लफ्रेंडला प्रपोज केला...

मुळचा भारतीय असलेल्या आणि हाँगकाँगसाठी खेळणाऱ्या किंचित शाहने मॅच हरल्यानंतर स्टेडिअमकडे धाव घेतली. त्याची गर्लफ्रेंड या प्रेक्षकांमध्ये बसलेली होती.

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2022 08:42 IST

Open in App

आशिया कपमध्ये भारताने हाँगकाँगला हरवून सुपर ४ मध्ये प्रवेश केला आहे. पाकिस्तानला धुळ चारल्यानंतर भारताने दुसरा सामनाही जिंकला. परंतू या सामन्यानंतर हाँगकाँगच्या एका खेळाडूने त्याच्या गर्लफ्रेंडचे हृदय जिंकले आहे. 

मुळचा भारतीय असलेल्या आणि हाँगकाँगसाठी खेळणाऱ्या किंचित शाहने मॅच हरल्यानंतर स्टेडिअमकडे धाव घेतली. त्याची गर्लफ्रेंड या प्रेक्षकांमध्ये बसलेली होती. तिच्याकडे गेल्यावर शाहने तिचा हात हातात घेऊन प्रपोज केला. ही घटना पाहून तिथे उपस्थित सर्वच लोक आश्चर्यचकित झाले. 

संघाच्या जर्सीमध्येच किंचित शहा सामना संपल्यानंतर लगेचच प्रेक्षकांपर्यंत पोहोचला. येथे लोकांना आश्चर्य वाटले. त्यानंतर एका मुलीकडे गेल्यावर किंचितने तिला गुडघ्यावर बसवून हातात अंगठी घेऊन प्रपोज केले. पूर्ण पांढर्‍या पोशाखात उभी असलेली तरुणी खूप खुश होती. तिने लगेचच होकार दिला आणि किंचितने तिच्या बोटात अंगठी घातली. हे दृश्य पाहून हाँगकाँगची संपूर्ण टीम उत्साहाने टाळ्या वाजवत होती. पराभवाचा लवलेशही त्यांच्या चेहऱ्यावरून कधीच निघून गेला होता. 

किंचित शहा मुंबईचा...किंचित शहा यांचा जन्म मुंबईत झाला. त्याचे वडीलही क्रिकेट खेळायचे. तो तीन महिन्यांचा असताना त्याचे वडील कुटुंबासह हाँगकाँगला गेले. वडिलांना क्रिकेट खेळताना पाहून वयाच्या १०व्या वर्षी त्यांनी लेदर बॉल क्रिकेटमध्ये भाग घेण्यास सुरुवात केली.  

टॅग्स :एशिया कप 2022भारतीय क्रिकेट संघ
Open in App