Ranji Trophy Final Mayank Agarwal Century : रणजी करंडक स्पर्धेतील अंतिम सामन्यात कर्नाटकचा संघ अडचणीत सापडला असताना अनुभवी फलंदाज मयंक अग्रवाल याने शतकी खेळी करत एकटा संघर्ष करताना दिसला. धावांसाठी संघर्षक करताना दिसलेल्या मयंकनं फायनल सामन्यात एकापाठोपाठ एक विकेट पडत असताना प्रथम श्रेणी क्रिकेटमधील २१ वे शतक साजरे केले. या खेळीसह त्याने रणजी स्पर्धेत ५००० धावांचा टप्पाही पार केला आहे.
'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा!
पहिल्यांदाच रणजी करंडक स्पर्धेतील फायनल खेळणाऱ्या जम्मू काश्मीरच्या संघाने पहिल्या डावात ५८४ धावा करत ८ वेळच्या रणजी चॅम्पियन कर्नाटकसंघाला बॅकफूटवर ढकलले आहे. जम्मू काश्मीरच्या संघाकडून शुभम पुंडीर १२१ (२४७) च्या शतकी खेळीशिवाय कर्णधारा पारस डोगरा ७० (१६६), अब्दुल समद ६१ (१०४), यावेर हसन ८८ (१५०), वाधवान ७० (१०९) आणि साहील लोत्रा ७२ (१३८) यांनी नवा इतिहास रचण्यासाठी संघासाठी उपयुक्त खेळी केली.
करुण नायरच्या पदरी भोपळा, देवदत्त पडिक्कल केएल राहुलही नाही चालला
लोकेश राहुल आणि मयंक अग्रवाल या जोडीनं कर्नाटकच्या डावाची सुरुवात केली. पण लोकेश राहुल ३९ चेंडूत फक्त १३ धावांवर माघारी फिरला. कर्णधार देवदत्त पडिक्कल याने १० चेडंत ११ धावा करून मैदान सोडले. करुण नायरला तर खातेही उघडता आले नाही. या तिन्ही विकेट्स याकुब नबी याने घेतल्या. विकेट्सचा हा सिलसिला कायम राहिला. परिणामी कर्नाटकच्या संघाकडून मयंकचे शतक आले असले तरी अन्य कोणताही बॅटर मैदानात तग धरू न शकल्याने जम्मू काश्मीरच्या संघाने सामन्यावरील पकड मजबूत केली आहे. ते पहिल्या वहिल्या जेतेपदासह इतिहास रचण्याच्या उंबरठ्यावर आहेत.