Join us
Daily Top 2Weekly Top 5

भारतीय क्रिकेटपटूची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली

पहिला सामनाच त्याच्यासाठी अखेरचा आंतरराष्ट्रीय सामना ठरला.

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2025 19:17 IST

Open in App

 Krishnappa Gowtham Retires From All Form Of Cricket : आगामी टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसाठी भारतीय संघाची नुकतीच घोषणा करण्यात आली. बीसीसीआयने कुणाला संधी दिली आणि कुणावर अन्याय झाला? यासंदर्भात चर्चा रंगत असताना आता भारतीय फिरकीपटूनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीचा निर्णय घेतला आहे.  हा क्रिकेटर दुसरा तिसरा कोणी नसून तो आहे कृष्णप्पा गौथम.

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! 

टीम इंडियाकडून एकमेव सामन्यात मिळाली संधी

कर्नाटकचा सर्वोत्तम अष्टपैलू खेळाडूने सोमवारी क्रिकेटच्या तिन्ही प्रकारातून निवृत्ती घेतल्याची घोषणा केली आहे. ऑफ स्पिन गोलंदाजीसह फलंदाजीतील उत्तुंग फटकेबाजीसह सामन्याला कलाटणी देण्याची क्षमता असलेल्या या खेळाडूने १४ वर्षांच्या कारकिर्दीत भारतीय संघाकडून फक्त एक वनडे सामना खेळला आहे. कृष्णप्पा गौथम याने २३ जैलै २०२१ मध्ये कोलंबो येथील प्रेमदासा स्टेडियमवर आंतरारष्ट्रीय एकदिवसीय सामन्यात पदार्पणाची संधी मिळाली होती. या सामन्यात त्याने एक विकेट घेतली होती. हा पहिला सामनाच त्याच्यासाठी अखेरचा आंतरराष्ट्रीय सामना ठरला.

VIDEO : "सर्वस्व दिलं, तरीही मनासारखं नाही घडलं!" रोहित शर्मा 'त्या' गोष्टीबद्दल पहिल्यांदाच बोलला

रणजीचा हंगाम गाजवून मिळवलं होतं IPL चं तिकीट

 देशांतर्गत क्रिकेटमध्ये  २०१२ कर्नाटक संघाकडून उत्तर प्रदेश विरुद्धच्या सामन्यातून त्याने रणजीत पदार्पण केले होते. पदार्पणाच्या सामन्यात त्याने सुरेश रैना आणि भुवनेश्वर कुमार यांची विकेट घेत सर्वांचे लक्षवेधून घेतले होते.  २०१६ -१७ च्या रणजी हंगामात त्याने २७ विकेट्स घेतल्या. या कामगिरीच्या जोरावर त्याने आयपीएलमध्ये एन्ट्री मारली होती.

IPL च्या लिलावात विक्रमी बोली

रणजी स्पर्धेतील कामगिरीच्या जोरावर २०१८ मध्ये त्याला आयपीएलमध्ये पदार्पणाची संधी मिळाली. २०२१ च्या IPL लिलावात त्याच्यावर विक्रम बोली लागली होती. चेन्नई सुपर किंग्जच्या संघाने ९ कोटी २५ लाख रुपयांसह त्याला आपल्या ताफ्यात सामील करून घेतले होते. तो सर्वात महागड्या अनकॅप्ड खेळाडूंपैकी एक आहे.  चेन्नई सुपर किंग्जशिवाय कृष्णप्पा गौथम मुंबई इंडियन्स, राजस्थान रॉयल्स आणि पंजाब किंग्सकडूनही खेळताना दिसला आहे.  २०१८ मध्ये आयपीएलमध्ये पदार्पण केल्यानंतर २०२४ पर्यंत त्याने ९ हंगामात ३६ सामने खेळले. यात २४७ धावा आणि १३ विकेट्स घेतल्याचा रेकॉर्ड आहे.  

English
हिंदी सारांश
Web Title : Indian cricketer Krishnappa Gowtham retires from international cricket after IPL stint.

Web Summary : Krishnappa Gowtham, Indian all-rounder, retires from all cricket forms after playing one ODI. Despite a record-breaking IPL bid by CSK for ₹9.25 crore, his international career remained brief. He debuted in Ranji with Karnataka in 2012.
टॅग्स :भारतीय क्रिकेट संघबीसीसीआयभारतीय क्रिकेट संघचेन्नई सुपर किंग्सआयपीएल २०२४