RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं

RCB मुळे वर्ल्ड कपच प्लॅनिंग कोलमडलं, नेमकं काय घडलं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2025 18:26 IST2025-08-12T18:14:50+5:302025-08-12T18:26:52+5:30

whatsapp join usJoin us
Karnataka Govt Bans Chinnaswamy Stadium Women’s World Cup Matches Shifted Out Of Bengaluru | RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं

RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

Karnataka Govt Bans Chinnaswamy Stadium Women’s World Cup  : भारत-श्रीलंका यांच्या संयुक्त यजमानपदाखाली आयोजित महिला वनडे वर्ल्ड कप स्पर्धेआधी भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेला मोठा धक्का बसला आहे. कर्नाटक सरकारनं एम चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी घातली असून महिला वनडे वर्ल्ड कप स्पर्धेतील या मैदानात नियोजित सामने कुठं खेळवायचं असा मोठा प्रश्न आयोजकांसमोर असेल.

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
 

RCB मुळे वर्ल्ड कपच प्लॅनिंग कोलमडलं, नेमकं काय घडलं?

इंडिया टुडेनं सूत्रांच्या हवाले दिलेल्या वृत्तानुसार, ओपनिंग सेरेमनीसह बंगळुरु शहरात नियोजित सर्व सामने अन्य ठिकाणी स्थलांतरित करण्यात येणार आहेत. न्यायमूर्ती जॉन मायकल डी'कुन्हा आयोगाच्या अहवालाचा दाखला देत कर्नाटक सरकारने एम चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी घातली आहे. हे स्टेडियम मोठ्या इवेंट्ससाठी असुरक्षित असल्याचा उल्लेख या अहवालात करण्यात आलाय.  रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या संघाने जेतेपद उंचावल्यावर विजयोत्सव साजरा करताना बंगळुरु येथील स्टेडियमवरील चेंगराचेंगरी प्रकरणात ११ लोकांना आपला जीव गमवावा लागला. याच पार्श्वभूमीवर या मैदानावर बंदीच सावट उमटले आहे. ज्याचा परिणाम महिला वर्ल्ड कपमधील सामन्यावर होणार आहे. 

Dewald Brevis: बेबी एबीनं इतिहासच बदलून टाकला, ऑस्ट्रेलियाविरुद्ध 'अशी' कामगिरी करणारा एकटाच!

कर्नाटक क्रिकेट असोसिएशनची नाराजी 

कर्नाटक सरकारच्या या निर्णयावर कर्नाटक राज्य क्रिकेट असोसिएशनने नाराजी व्यक्त केलीये. आतापर्यंत एम चिन्नास्वामी मैदानात ७५० सामने अन् आयपीएलमधील १५ हंगामातील लढती खेळवण्यात आल्या आहेत. इथं कोणतीही समस्या आली नाहीये. आम्ही या मैदानात प्रेक्षकांशिवाय वर्ल्ड कप स्पर्धेतील सामने खेळवण्याची तयारीही दर्शवली होती. त्याचीही परवानगी मिळाली नाही, असे कर्नाटक क्रिकेट असोसिशेनने म्हटले आहे.

फायनलही इथंच रंगणार होती, पण...

३० सप्टेंबरपासून महिला वनडे वर्ल्ड कप स्पर्धेला सुरुवात होणार आहे. ओपनिंग सेरेमनीसह फायनल आणि आणि सेमीफायनलसह चार मॅछेस इथं खेळवण्यात येणार होते. पण आता या सामन्यासाठी दुसऱ्या शहरातील स्टेडियमवर खेळवण्याची वेळ येणार आहे. बीसीसीआय यासंदर्भात नेमका काय निर्णय घेणार ते पाहण्याजोगे असेल.
 

Web Title: Karnataka Govt Bans Chinnaswamy Stadium Women’s World Cup Matches Shifted Out Of Bengaluru

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.