कोलंबो: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील क्रिकेट सामना म्हणजे केवळ खेळ नसून ती एक भावना असते. कोलंबोच्या प्रेमदासा स्टेडियमवर रंगलेल्या टी-२० विश्वचषक २०२६ च्या हायव्होल्टेज सामन्यात अशाच एका खास क्षणाने चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले. आयसीसी अध्यक्ष जय शाह हे आपल्या चिमुकल्या मुलाला कडेवर घेऊन हा सामना पाहताना दिसले. या गोड क्षणाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
सामना अतिशय चुरशीच्या वळणावर असताना कॅमेरा स्टँड्सकडे वळला आणि तिथे जय शाह आपल्या मुलाला मांडीवर बसवून खेळाचा आनंद घेताना दिसले. जय आणि ऋषिता यांचा विवाह २०१५ मध्ये झाला आहे. या जोडप्याला दोन मुली आणि एक मुलगा आहे. नोव्हेंबर २०२४ मध्ये जय शाह आणि त्यांची पत्नी ऋषिता पटेल यांना पुत्ररत्न प्राप्त झाले होते. आज हा चिमुकला पहिल्यांदाच भारत-पाक सारख्या मोठ्या सामन्यात आपल्या वडिलांसोबत स्टेडियममध्ये दिसला. यापूर्वी जय शाह हे आयपीएलमध्ये मुलींसोबत दिसले होते.
सोशल मीडियावर चर्चाव्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये दिसते की, जेव्हा इशान किशनची महत्त्वपूर्ण विकेट पडली आणि पूर्ण स्टेडियम शांत झाले, तेव्हा जय शाह सुद्धा काहीसे शांत आणि गंभीर चेहऱ्याने सामन्याकडे पाहत होते. मात्र, त्यांच्या मुलाचा निरागसपणा पाहून नेटीझन्सनी या व्हिडिओवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. "आयसीसी अध्यक्षांची ड्युटी आणि वडिलांची जबाबदारी एकाच वेळी पार पाडताना जय शाह," अशा शब्दांत चाहत्यांनी त्यांचे कौतुक केले आहे.
सामन्याचा थरारया सामन्यात भारताने इशान किशनच्या ७७ धावांच्या बळावर पाकिस्तानसमोर १७६ धावांचे लक्ष्य ठेवले होते. मैदानावर खेळाडू घाम गाळत असताना स्टँड्समधील ही 'क्यूट' फॅमिली मोमेंट प्रेक्षकांसाठी चर्चेचा विषय ठरली.
Web Summary : Jay Shah was seen with his young son at the India-Pakistan match. Social media buzzed about the adorable moment as he balanced ICC duties with fatherhood. India set a target of 176 runs.
Web Summary : भारत-पाकिस्तान मैच में जय शाह अपने बेटे के साथ दिखे। सोशल मीडिया पर इस प्यारे पल की चर्चा हुई, क्योंकि उन्होंने आईसीसी की जिम्मेदारियों के साथ-साथ पिता होने का भी फर्ज निभाया। भारत ने 176 रनों का लक्ष्य रखा।