आगामी इंग्लंड दौऱ्याआधी रोहित शर्मानं कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. त्याच्या या निर्णयानंतर भारतीय संघाचे नेतृत्व कोण करणार अशी चर्चा रंगली आहे. जसप्रीत बुमराहला डावलून शुबमन गिल या शर्यतीत आघाडीवर असल्याची चर्चाही क्रिकेट वर्तुळात रंगतीये. पण आता जसप्रीत बुमराहने स्वत: कर्णधारपदाची ऑफर नाकारल्याची माहिती समोर येत आहे. जाणून घेऊयात काय त्यासंदर्भातील गोष्ट अन् रोहित शर्माच्या निवृत्तीनंतर टीम इंडियाचे नेतृत्व करायला त्याने नकार दिल्यामागचे कारण...
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
बुमराह इंग्लंड दौऱ्यावर जाणार, पण सर्व सामने नाही खेळणार
रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघात जसप्रीत बुमराह याच्याकडे उप कर्णधारपदाची जबाबदारी सोपवण्यात आली होती. आता रोहित शर्मा निवृत्त झाल्यावर आपोआपच संघाचे नेतृत्व त्याच्याकडे आले असते. पण सध्या शुबमन गिलचे नाव आघाडीवर आहे. यामागचं कारण जसप्रीत बुमराहने कॅप्टन्सीपासून दूर राहण्याचा घेतलेला निर्णय आहे. स्काय स्पोर्ट्सच्या वृत्तानुसार, बुमराहने स्वत: कॅप्टन्सीची ऑफर नाकारलीये. दुखापतीची समस्या आणि वर्कलोड मॅनेज करण्याच्या हेतून तो इंग्लंड विरुद्धच्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत तो सर्व सामने खेळणार नाही. त्यामुळेच त्याने संघाच्या नेतृत्वाची जबाबदारी घेण्याला नकार दिला आहे.
गौतम गंभीरलाही वाटते की..., विराटच्या निवृत्तीसंदर्भातील चर्चेत आणखी एका गोष्टीची भर
जसप्रीत बुमराहनंतर गिल अन् पंत शर्यतीत
भारतीय कसोटी संघाच्या नेतृत्वाच्या शर्यतीतून बुमराह आउट झाल्यावर शुबमन गिल आणि रिषभ पंत या दोन स्टार क्रिकेटर्सची नावे आता आघाडीवर आहेत. त्यातही शुबमन गिलच बाजी मारेल असे वाटते. एवढेच नाही तर इंग्लंड दौऱ्यावर नव्याने संघ बांधणी करताना रिषभ पंतकडे उप कर्णधारपदाची जबाबदारीही दिली जाऊ शकते.
बुमराहने तीन सामन्यात केलंय टीम इंडियाचे नेतृत्व
जसप्रीत बुमराहच्या कॅप्टन्सीबद्दल बोलायचे तर त्याने बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी २०२४-२५ स्पर्धेत रोहित शर्माच्या अनुपस्थितीत दोन कसोटी सामन्यात टीम इंडियाचे नेतृत्व केल्याचे पाहायला मिळाले होते. याआधी २०२२ मध्ये इंग्लंड दौऱ्यावरील एका कसोटी सामन्यासाठी तोच रोहितच्या जागी संघाचे नेतृत्व करताना दिसला होता. या तीन पैकी एका सामन्यात भारतीय संघ जिंकला होता.