Join us

जसप्रीत बुमराहने वर्षाच्या पहिल्याच दिवशी रचला इतिहास, केला एकाही भारतीयाला न जमलेला पराक्रम

Jasprit Bumrah, IND vs AUS: ऑस्ट्रेलियन फलंदाजांना त्यांच्याच खेळपट्ट्यांवर जसप्रीत बुमराहने सळो की पळो करून सोडलं आहे

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2025 15:06 IST

Open in App

Jasprit Bumrah ICC Test Rankings : टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह बॉर्डर गावस्कर ट्रॉफीमध्ये अप्रतिम कामगिरी करत आहे. या मालिकेत सर्वाधिक विकेट घेणारा तो गोलंदाज आहे. याशिवाय तो काही काळापासून आयसीसी कसोटी क्रमवारीत पहिल्या क्रमांकाचा गोलंदाज राहिला आहे. इंटरनॅशनल क्रिकेट कौन्सिलने आता २०२५ सालची पहिली रँकिंगही जाहीर केली आहे. जसप्रीत बुमराहने या क्रमवारीत इतिहास रचला आहे. जसप्रीत बुमराहने असा पराक्रम केला आहे, जो यापूर्वी कोणताही भारतीय गोलंदाज करू शकला नव्हता.

बुमराहने वर्षाच्या पहिल्याच दिवशी रचला इतिहास

बुमराहने अलीकडेच मेलबर्न कसोटीत ९ विकेट्स घेतल्या होत्या. या दमदार कामगिरीमुळे त्याला क्रमवारीत अव्वल क्रमांकाचा कसोटी गोलंदाज म्हणून कायम राहण्यास मदत झाली. पण त्यासोबतच त्याने एक कामगिरी केली. जसप्रीत बुमराहचे आता ९०७ रेटिंग गुण आहेत. यासह तो आयसीसी क्रमवारीच्या इतिहासातील सर्वोच्च गुण मिळवणारा भारतीय कसोटी गोलंदाज बनला आहे. याआधी भारताच्या कोणत्याही गोलंदाजाला कसोटी क्रमवारीत इतके रेटिंग गुण मिळवता आले नव्हते.

आर अश्विनला केलं 'ओव्हरटेक'

जसप्रीत बुमराहच्या आधी आर अश्विन हा आयसीसी क्रमवारीच्या इतिहासातील सर्वोच्च क्रमांकाचा भारतीय कसोटी गोलंदाज होता. बुमराहने गेल्या वेळच्या रँकिंगमध्ये अश्विनची बरोबरी केली होती. यावेळी तो अश्विनला मागे टाकून पुढे गेला. अश्विनने डिसेंबर २०१६ मध्ये सर्वोच्च ९०४ रेटिंग पॉइंट्सचा आकडा गाठला होता.

टॅग्स :जसप्रित बुमराहभारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाआर अश्विनआयसीसीआॅस्ट्रेलिया