Join us

PAK vs NZ : किवी संघाचा पाक दौरा! न्यूझीलंडच्या खेळाडूंना पाकिस्तानात मिळणार जागतिक दर्जाची सुरक्षा

pakistan vs new zealand : न्यूझीलंडचा संघ पाकिस्तानात ट्वेंटी-२० आणि वन डे मालिका खेळणार आहे. 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2023 13:13 IST

Open in App

pakistan vs new zealand series । इस्लामाबाद : पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (PCB) न्यूझीलंडविरूद्धच्या (PAK vs NZ) घरच्या मालिकेसाठी मोठी खबरदारी बाळगली आहे. सुरक्षेच्या कारणास्तव भारतीय संघाने पाकिस्तानात जाण्यास नकार दिला आहे, तर न्यूझीलंडचा संघ पुन्हा एकदा पाकिस्तान दौऱ्यावर जात आहे. त्यामुळे किवी संघाच्या खेळाडूंच्या सुरक्षेसाठी पाकिस्तानमध्ये कडेकोट बंदोबस्त करण्यात आला आहे. खरं तर न्यूझीलंडचा संघ २०२१ मध्ये देखील पाकिस्तान दौऱ्यावर गेला होता पण सुरक्षेच्या कारणास्तव मालिका सुरू होण्याआधीच माघारी परतला होता.

दरम्यान, न्यूझीलंडच्या खेळाडूच्या सुरक्षेसाठी इस्लामाबाद पोलिसांनी विशेष मोहिम हाती घेतली आहे. न्यूझीलंडचा संघ १४ एप्रिलपासून पाकिस्तानच्या धरतीवर ट्वेंटी-२० मालिका खेळणार आहे. आगामी मालिकेच्या पार्श्वभूमीवर इस्लामाबाद पोलिसांनी सुरक्षेची खबरदारी घेतली असून ट्विटच्या माध्यमातून याबाबतची माहिती दिली आहे. "न्यूझीलंडच्या क्रिकेट संघाला आम्ही जागतिक दर्जाची सुरक्षा प्रदान करू. इस्लामाबाद कॅपिटल पोलिसांनी २०२२-२३ मध्ये इंग्लंडच्या संघाला आणि पाकिस्तान सुपर लीगच्या आठव्या हंगामाला उच्चस्तरीय सुरक्षा पुरवली होती", असे इस्लामाबाद पोलिसांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

न्यूझीलंड विरूद्ध पाकिस्तानचे सामने -

  1. १४ एप्रिल - पहिला ट्वेंटी-२० सामना, लाहोर
  2. १५ एप्रिल - दुसरा ट्वेंटी-२० सामना, लाहोर
  3. १७ एप्रिल - तिसरा ट्वेंटी-२० सामना, लाहोर
  4. २० एप्रिल - चौथा ट्वेंटी-२० सामना, रावळपिंडी
  5. २४ एप्रिल - पाचवा ट्वेंटी-२० सामना, रावळपिंडी
  6. २६ एप्रिल - पहिला वन डे सामना, रावळपिंडी
  7. ३० एप्रिल - दुसरा वन डे सामना, कराची
  8. ३ मे - तिसरा वन डे सामना, कराची
  9. ५ मे - चौथा वन डे सामना, कराची
  10. ७ मे - पाचवा वन डे सामना, कराची

न्यूझीलंडविरूद्धच्या ट्वेंटी-२० मालिकेसाठी पाकिस्तानी संघ - बाबर आझम (कर्णधार), शादाब खान, फरीम अशरफ, फखर झमान, हारिस रौफ, इफ्तिखार अहमद, इहसनुल्लाह, इमाद वसीम, मोहम्मद हारिस, मोहम्मद नवाज, मोहम्मद रिझवान, नसीम शाह, सॅम अयुब, शाहीन शाह आफ्रिदी, शान मसूद, झमान खान. 

न्यूझीलंडविरूद्धच्या वन डे मालिकेसाठी पाकिस्तानी संघ - बाबर आझम (कर्णधार), शादाब खान, अब्दुला शफिक, फखर झमान, हारिस रौफ, हारिस सोहेल, इहसनुल्लाह, इमाम-उल-हक, मोहम्मद नवाज, मोहम्मद रिझवान, मोहम्मद वसीम ज्युनिअर, नसीम शाह, सलमान अली अघा, शाहीन शाह आफ्रिदी, शान मसूद, उसामा मीर. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

 

टॅग्स :पाकिस्तानन्यूझीलंडआंतरराष्ट्रीय क्रिकेटटी-20 क्रिकेटबाबर आजम
Open in App