Irfan Pathan on Rohit Sharma : भारतीय टी-२० आणि कसोटी संघाचा माजी कर्णधार रोहित शर्मा आता फक्त वनडेवर फोकस करणार आहे. आगामी ऑस्ट्रेलिया दौऱ्याआधी त्याने बीसीसीआयची फिटनेस टेस्ट दिली अन् यात हिटमॅन पासही झालाय. पण तरीही अजूनही एक प्रश्न चर्चेत आहे तो म्हणजे तो छोट्या अन् मोठ्या फॉरमॅटमधून निवृत्ती घेतल्यावर एकदिवसीय क्रिकेटच्या रुपात मध्यम मार्गावर तो किती दिवस चालणार ? २०२७ चा वनडे वर्ल्ड कप स्पर्धेत तो खेळणार का? हे प्रश्न चर्चेचा विषय ठरत आहेत. यासंदर्भात माजी अष्टपैलू इरफान पठाण याने भाष्य केले आहे. रोहित शर्मासोबत झालेल्या गप्पा गोष्टी सांगत त्याने रोहित शर्माच्या भविष्यावर 'बोलंदाजी' केली आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
रोहित संदर्भात नेमकं काय म्हणाला इरफान पठाण?
रोहित शर्मासोबत झालेल्या संवादाचा दाखला देत, इरफान पठाण म्हणाला की, हिटमॅनला अजूनही क्रिकेटचा आनंद घेत आहे. सातत्याने खेळत वनडे कारिकर्द शक्य तेवढी मोठी करण्यासाठी प्रयत्नशील असेन, अशी गोष्ट खुद्द रोहितनं बोलून दाखवलीये. स्टार क्रिकेटरसोबत काय आव्हाने असतील यावरही इरफान पठाण बोलला आहे. तो म्हणाला की, रोहित शर्मानं फिटनेस टेस्ट पास केलीये. वय हा त्याच्यासमोर मोठा अडथळा अजिबात नाही. फक्त सातत्याने खेळण्याची संधी मिळणं हे त्याच्यासाठी चॅलेंजिग असेल.
रोहित शर्माची झाली फिटनेस टेस्ट! पास की नापास, काय आला निकाल? संघात स्थान मिळणार?
फक्त रोहितवरच नव्हे तर तो विराटवरही बोलला
रोहित शर्मासह विराट कोहलीसाठी इथून पुढचा प्रवास खूप कठीण असेल, असे मतही इरफान पठाण याने व्यक्त केले आहे. यामागचं कारण सांगताना तो म्हणाला की, दोघांनीही टी-२० आणि कसोटीतून निवृत्ती घेतली आहे. संघातील स्थान टिकवून ठेवण्यासाठी फिटनेसशिवाय सातत्याने खेळणेही महत्त्वाचे असते. भारतीय संघ येत्या काळात फारच कमी वनडे सामने खेळणार आहे. त्यामुळे मॅच टाइम हा दोन्ही दिग्गजांच्या करिअरमध्ये एक मोठा अडथळा ठरू शकतो, असे इरफान पठाणला वाटते.
Web Title: Irfan Pathan On Rohit Sharma ODI Future Reveals His World Cup Plans
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.