Join us
Daily Top 2Weekly Top 5

IPL Points Table 2026 : ३ संघ सेफ झोनमध्ये; टॉप ४ च्या शर्यतीत ५ संघात तगडी स्पर्धा

MI आणि LSG अन्य संघासाठी ठरू शकतात मोठा अडथळा

By सुशांत जाधव | Updated: May 6, 2026 11:06 IST

Open in App

IPL Points Table 2026  After DC vs CSK Team Standings  : आयपीएल २०२६ स्पर्धेतील मंगळवारी दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर झालेल्या ४८ व्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सच्या संघाने दिल्ली कॅपिटल्सला पराभूत करत प्लेऑफ्सच्या दिशेनं आणखी एक पाऊल टाकले. घरच्या मैदानातील पराभवानंतर दिल्ली कॅपिटल्सच्या संघासाठी आघाडीच्या चारमध्ये स्थान निश्चित करणं अधिक आव्हानात्मक झाले आहे.  

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! 

१० सामन्यातील पाचव्या  विजयासह चेन्नई सुपर किंग्सचा संघ १० गुणांच्या कमाईसह सहाव्या स्थानावर असून एवढ्याच सामन्यात दिल्ली कॅपिटल्सचा संघ ४ विजय आणि ६ पराभवानंतर ८ गुणांसह सातव्या स्थानावर आहे. पंजाब किंग्स आणि गत चॅम्पियन रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुसह सनरायझर्स हैदराबाद अधिक मजबूत स्थितीत असून चौथ्या स्थानासाठी चांगलीच चुरस पाहायला मिळणार आहे. इथं जाणून घेऊयात गुणतालिकेत कोणता संघ कितव्या स्थानी आहे? प्लेऑफ्सच्या शर्यतीत  कोणत्या संघात पाहायला मिळेल तगडी फाईट? यासंदर्भातील सविस्तर माहिती

प्लेऑफ्सच्या शर्यतीत तीन संघ आघाडीवर

पंजाब किंग्स हा ९ सामन्यानंतर १३ गुणांसह गुणतालिकेत अव्वलस्थानी असून रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या संघानेही ९ सामन्यानंतर आपल्या खात्यात १२ गुण मिळवले असून ते दुसऱ्या स्थानावर आहेत. त्यांच्या पाठोपाठ सनरायझर्स हैदराबादचा संघ १० सामन्यात १२ गुणांच्या कमाईसह तिसऱ्या स्थानावर आहे. हे तीन संघ प्लेऑफ्सच्या शर्यतीत आघाडीवर आहेत. बुधवारी पंजाब किंग्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात नंबर वनसाठी लढाई पाहायला मिळेल. 

Sanju Samson Record : संजूनं साधला 'द्विशतकी' डाव; किंग कोहली-KL राहुलनंतर अशी कामगिरी करणारा तो पहिलाच

आघाडीच्या चारमध्ये एन्ट्री मारण्यासाठी पाच संघात तगडी स्पर्धा

यंदाच्या हंगामात चौथ्या स्थानासाठी चांगलीच स्पर्धा रंगल्याचे पाहायला मिळणार आहे. चेन्नईच्या संघाने दिल्ली विरुद्धच्या सामन्यातील विजयासह आपली प्लेऑफ्सची आस कायम ठेवली आहे. दुसरीकडे पराभवानंतरही दिल्ली या प्लेऑफ्सच्या शर्यतीत टिकून आहे. या दोन्ही संघाच्या तुलनेत गुजरात टायटन्स पुढे दिसतो. कोलकाताचा संघही सर्व सामने जिंकून १७ गुणांपर्यंत पोहचू शकतो. त्यामुळे चारमध्ये पोहचण्यासाठी पाच संघात चांगीलच चुरस पाहायला मिळेल. 

MI आणि LSG अन्य संघासाठी मोठा अडथळा

मुंबई इंडियन्स आणि लखनौ सुपर जाएंट्सचा संघ उर्वरित सर्व सामने जिंकून १४ गुणांपर्यंतच मजल मारू शकतो. दोन्ही संघ सध्या 'जर तर'च्या समीकरणात अडकले असून अन्य संघासाठी ते अडथळा निर्माण करू शकतात.

क्रमांकसंघसामनेविजयपराभवN/Rगुणनेट रन रेट (NRR)
पंजाब किंग्स (PBKS)१३+०.८५५
रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (RCB)१२+१.४२०
सनरायझर्स हैदराबाद (SRH)१०१२+०.८३२
राजस्थान रॉयल्स (RR)१०१२+०.५१०
गुजरात टायटन्स (GT)१०१२-०.१४७
चेन्नई सुपर किंग्स (CSK)१०१०+०.१५१
दिल्ली कॅपिटल्स (DC)१०-०.९४९
कोलकाता नाईट रायडर्स (KKR)-०.७५१
मुंबई इंडियन्स (MI)१०-०.६५०
१०लखनऊ सुपर जायंट्स (LSG)-१.०८०
English
हिंदी सारांश
Web Title : IPL 2026: Three teams in safe zone, tough fight for top 4

Web Summary : Chennai Super Kings defeated Delhi Capitals, impacting playoff race. Punjab Kings lead the points table. Five teams fiercely compete for the top four spots. Mumbai Indians and Lucknow Super Giants create obstacles for other teams.
टॅग्स :आयपीएल २०२६पंजाब किंग्सरॉयल चॅलेंजर्स बेंगलोरसनरायझर्स हैदराबादराजस्थान रॉयल्सगुजरात टायटन्सचेन्नई सुपर किंग्सदिल्ली कॅपिटल्सकोलकाता नाईट रायडर्समुंबई इंडियन्सलखनौ सुपर जायंट्स