Join us
Daily Top 2Weekly Top 5

आयपीएलला दुखापतींचे ग्रहण, सॅम करन खेळणार नाही; ऑस्ट्रेलियाचे वेगवान गोलंदाजही सुरुवातीच्या काही सामन्यांना मुकणार

इंग्लंडचा अष्टपैलू सॅम करन याला ग्रोइन दुखापतीमुळे माघार घ्यावी लागली आहे. यामुळे राजस्थान संघाला मोठा धक्का बसला आहे. आता राजस्थान संघ त्याच्या जागी इतर खेळाडू संघात घेण्याच्या पर्यायावर विचार करत आहे. 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2026 09:19 IST

Open in App

जयपूर : आगामी आयपीएल सत्राला दुखापतींचे ग्रहण लागल्याचे दिसत आहे. इंग्लंडचा स्टार अष्टपैलू सॅम करन दुखापतीमुळे यंदा आयपीएलमध्ये सहभागी होऊ शकणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्याच वेळी पॅट कमिन्स, मिचेल स्टार्क आणि जोश हेझलवूड हे ऑस्ट्रेलियाचे वेगवान गोलंदाजी त्रिकूटही दुखापतीमुळे सुरुवातीचे काही सामने खेळणार नाहीत. 

इंग्लंडचा अष्टपैलू सॅम करन याला ग्रोइन दुखापतीमुळे माघार घ्यावी लागली आहे. यामुळे राजस्थान संघाला मोठा धक्का बसला आहे. आता राजस्थान संघ त्याच्या जागी इतर खेळाडू संघात घेण्याच्या पर्यायावर विचार करत आहे. 

भारताविरुद्ध टी-२० विश्वचषक उपांत्य फेरीत पराभव पत्करणाऱ्या इंग्लंड संघाचा सॅम सदस्य होता. त्याला राजस्थानने चेन्नई संघाकडून विकत घेतले होते आणि त्याच्या बदल्यात संजू सॅमसन चेन्नई संघाकडून खेळेल. २७ वर्षीय सॅमला १८.५ कोटी रुपयांना विकत घेण्यात आले होते. 

हर्षित राणा संपूर्ण आयपीएलमधून बाहेरकोलकाता संघाचा वेगवान गोलंदाज हर्षित राणा हा संपूर्ण आयपीएल २०२६ मधून बाहेरपडला आहे. 

टी-२० विश्वचषकाच्या  सराव सामन्यादरम्यान उजव्या गुडघ्याला लिगामेंट स्ट्रेन दुखापतीमुळे त्याला हा फटका बसला. शस्त्रक्रियेनंतर तो सध्या पुनर्वसन प्रक्रियेतून जात आहे. 

संघाचे मुख्य प्रशिक्षक अभिषेक नायर यांनी हर्षित राणा खेळणार नसल्याचे सांगितले. कोलकाताचा पहिला सामना २९ मार्चलामुंबईविरुद्ध आहे.

कांगारूंनाही दुखापत -पॅट कमिन्स, मिचेल स्टार्क आणि जोश हेझलवूड हे ऑस्ट्रेलियाचे स्टार वेगवान गोलंदाजही दुखापतीमुळे यंदाच्या आयपीएल सत्रात सुरुवातीचे काही सामने खेळू शकणार नाहीत. याआधीच ऑस्ट्रेलियाच्या नॅथन एलिसने दुखपतीमुळे आयपीएलमधून माघार घेतली होती. 

आगामी व्यस्त आंतरराष्ट्रीय सत्र लक्षात घेऊन ऑस्ट्रेलिया आपल्या वेगवान गोलंदाजांचा कार्यभार काळजीपूर्वक व्यवस्थापित करत आहे. पुढील एक वर्षात ऑस्ट्रेलियाला तब्बल २१ कसोटी सामनेखेळायचे आहेत. 

ऑस्ट्रेलियाचा संघ दक्षिण आफ्रिका, भारत आणि इंग्लंड दौऱ्यावर जाणार असून, २०२७ मध्ये एकदिवसीय सामन्यांचा विश्वचषक होणार आहे. 

कमिन्स हैदराबादचा कर्णधार आहे. स्टार्क दिल्लीकडून, तर हेझलवूड बंगळुरूकडून खेळतो. तसेच ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू जॅक एडवर्ड्स हा पायाच्या दुखापतीमुळे आयपीएलमधून बाहेर पडला आहे. त्याला हैदराबादने तीन कोटी रुपयांत खरेदीकेले होते.

...हे खेळाडू यंदा खेळणार नाहीतहर्षित राणा (कोलकाता : गुडघ्याची दुखापत), नाथन एलिस (चेन्नई : हॅमस्ट्रिंगची दुखापत), मॅथ्यू शॉर्ट (चेन्नई : अंगठ्याला फ्रॅक्चर), अथर्व अंकोलेकर (मुंबई : गुडघ्याची दुखापत), जॅक एडवर्ड्स (हैदराबाद : पायाची दुखापत), ईशान मलिंगा (खांद्याची दुखापत), सॅम करन (राजस्थान : जांघेची दुखापत), डोनोव्हन फरेरा (खांद्याची दुखापत), वानिंदू हसरंगा (लखनौ : हॅमस्ट्रिंगची समस्या), मोहसिन खान (गुडघ्याची शस्त्रक्रिया), मयंक यादव (फिटनेसबाबतच्या चिंता कायम).

सुरुवातीच्या सामन्यांना मुकणार -पॅट कमिन्स (हैदराबाद)कंबर (स्ट्रेस फ्रॅक्चर) जोश हेझलवूड (बंगळुरू)हॅमस्ट्रिंग दुखापतमिचेल स्टार्क (गुजरात)दुखापतीतून अद्यापसावरलेला नाही. लोकी फर्ग्युसन (पंजाब)पोटरीची दुखापतमथिशा पथिराना (कोलकाता)पोटरीची दुखापत

 

English
हिंदी सारांश
Web Title : Injuries Plague IPL: Curran Out, Aussie Pacers to Miss Games

Web Summary : IPL faces injury woes. Sam Curran is out, and key Australian pacers—Cummins, Starc, Hazlewood—will miss initial matches. Harshit Rana is sidelined. Several other players are also ruled out due to injuries, impacting team compositions.
टॅग्स :सॅम कुरेनभारतआॅस्ट्रेलियाइंग्लंडआयपीएल २०२४