IPL 2024 KKR vs SRH: WHAT A CATCH! उडता 'मयंक', युवा खेळाडूचा 'लय भारी' झेल

IPL 2024 KKR vs SRH Live Score Card: कोलकाता नाईट रायडर्सने सनरायझर्स हैदराबादसमोर २०९ धावांचे तगडे लक्ष्य ठेवले.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2024 09:58 PM2024-03-23T21:58:22+5:302024-03-23T21:59:12+5:30

whatsapp join usJoin us
Ipl Match 2024 live score KKR vs SRH Mayank Markande holds on well to dismiss the explosive Ramandeep Singh, watch here video | IPL 2024 KKR vs SRH: WHAT A CATCH! उडता 'मयंक', युवा खेळाडूचा 'लय भारी' झेल

IPL 2024 KKR vs SRH: WHAT A CATCH! उडता 'मयंक', युवा खेळाडूचा 'लय भारी' झेल

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

IPL 2024 KKR vs SRH Live Updats In Marathi । कोलकाता: आयपीएलच्या यंदाच्या हंगामाला सुरुवात झाली असून कोलकाता नाईट रायडर्स आणि सनरायझर्स हैदराबाद (KKR vs SRH) यांच्यात तिसरा सामना खेळवला जात आहे. नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना केकेआरच्या संघाने २०८ धावांचा डोंगर उभारला. आजच्या सामन्यासाठी नाणेफेक जिंकून पॅट कमिन्सने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना यजमान केकेआरने धावांचा डोंगर उभारला. कोलकाता येथील ईडन गार्डन्स स्टेडियमवर हा सामना खेळवला जात आहे. (IPL 2024 Videos) केकेआरने हैदराबादला विजयासाठी २०९ धावांचे तगडे आव्हान दिले. 

यजमान संघाकडून सुरुवातीला फिल साल्ट (५४) आणि रमनदीप सिंग यांनी शानदार खेळी केली. त्यानंतर आंद्रे रसेलच्या वादळाने हैदराबादच्या गोलंदाजांना धू धू धुतले. केकेआरकडून फिल साल्टने (५४) धावा केल्या, तर सुनील नरेन (२), व्यंकटेश अय्यर (७), श्रेयस अय्यर (०), नितीश राणा (९), रमनदीप सिंग (३५), रिंकू सिंग (२३) आणि आंद्रे रसेलने नाबाद ६४ धावा केल्या. केकेआरने निर्धारित २० षटकांत ७ बाद २०८ धावा केल्या. रसेलने ७ षटकार आणि ३ चौकारांच्या मदतीने २५ चेंडूत ६४ धावा कुटल्या. 

दरम्यान, पॅट कमिन्सच्या गोलंदाजीवर मयंक मार्कंडेयने एक अप्रतिम झेल घेतला. रमनदीप सिंग चांगल्या लयनुसार खेळत असताना कमिन्सने त्याला आपल्या जाळ्यात फसवले, ज्याला मयंकने मोलाची साथ दिली. 

KKR चा संघ -
श्रेयस अय्यर (कर्णधार), फिल साल्ट (यष्टीरक्षक), व्यंकटेश अय्यर, नितीश राणा, रिंकू सिंग, आंद्रे रसेल, सुनील नरेन, रमनदीप सिंग, मिचेल स्टार्क, हर्षित राणा आणि वरूण चक्रवर्ती. 

SRH चा संघ - 
पॅट कमिन्स (कर्णधार), मयंक अग्रवाल, राहुल त्रिपाठी, एडन मार्करम, हेनरिक क्लासेन (यष्टीरक्षक), अब्दुल समद, शाहबाज अहमद, मार्को जान्सेन,  भुवनेश्वर कुमार, मयंक मार्कंडेय आणि टी नटराजन, 

Web Title: Ipl Match 2024 live score KKR vs SRH Mayank Markande holds on well to dismiss the explosive Ramandeep Singh, watch here video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.