Join us  

देशासाठी खेळणं सोडा आम्ही ५१ कोटी देतो; IPL फ्रँचायझीचं आंतरराष्ट्रीय खेळाडूंना पैशांच आमीष?

सध्या फ्रँचायझी ट्वेंटी-२० लीगची क्रेझ आहे... इंडियन प्रीमिअर लीग ही जगातील सर्वात मोठी अन् यशस्वी फ्रँचायझी लीग आहे.. या लीगमध्ये खेळण्यासाठी जगभरातील स्टार खेळाडू उत्सुक असतात..

By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2023 5:51 PM

Open in App

सध्या फ्रँचायझी ट्वेंटी-२० लीगची क्रेझ आहे... इंडियन प्रीमिअर लीग ही जगातील सर्वात मोठी अन् यशस्वी फ्रँचायझी लीग आहे.. या लीगमध्ये खेळण्यासाठी जगभरातील स्टार खेळाडू उत्सुक असतात.. आयपीएल २०२३ ही जोरात सुरू आहे. भारतासह जगभरातील अनेक मोठे क्रिकेटपटू या स्पर्धेत सहभागी झाले आहेत. आयपीएलसाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने ( ICC) खास अडीच महिन्यांची विंडो ठेवली आहे आणि त्यामुळे आयपीएलच्या कालावधीत आंतरराष्ट्रीय क्रिकेट खूप कमी आहे. दरम्यान, एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. काही आयपीएल फ्रँचायझींनी संघांसाठी खेळण्यासाठी अनेक खेळाडूंना आपल्या देशासाठी खेळणे सोडा असा सल्ला दिल्याचे, वृत्त समोर येत आहे. 

दिल्ली कॅपिटल्सच्या खेळाडूने पार्टीत महिलेला छेडलं अन् पुढे जे घडलं ते सर्वांना महागात पडलं!

ब्रिटिश वृत्तपत्र द टाइम्सने एका वृत्तात दावा केला आहे की, काही आयपीएल फ्रँचायझींनी इंग्लंडसह इतर अनेक देशांतील क्रिकेटपटूंशी संपर्क साधला आहे. संघ आणि खेळाडूंमध्ये करारावर चर्चा केली जात आहे, ज्या अंतर्गत ते वर्षभर वेगवेगळ्या ट्वेंटी-२० लीगमध्ये खेळताना दिसतील. यासाठी त्यांना त्यांच्या देशाच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट बोर्डाशी पूर्णपणे संबंध तोडावे लागतील. अहवालानुसार, किमान आयपीएल फ्रँचायझींनी या मुद्द्यावर इंग्लंडच्या खेळाडूंशी अनौपचारिक चर्चा सुरू केली आहे. यापैकी काही आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू देखील आहेत. वार्षिक करारांतर्गत इंग्लंड क्रिकेट बोर्डाशी संबंधित आहेत. त्यांच्याशिवाय न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडिजसारख्या संघांशी संबंधित खेळाडूही आहेत.

जगभरातील वेगाने वाढणाऱ्या ट्वेंटी-२० लीगची संख्या हे त्याचे प्रमुख कारण आहे. विशेषत: त्या लीगमध्ये आयपीएल फ्रँचायझींच्या संघांची गुंतवणूक आहे. SA20, CPL, ILT20 आणि मेजर लीग T20 मध्ये IPL फ्रँचायझींचा सहभाग आहे. मात्र, कोणत्या फ्रँचायझींनी ही चर्चा सुरू केली आणि कोणत्या खेळाडूंसोबत अशी चर्चा झाली हे या अहवालात सांगण्यात आलेले नाही.  अशा परिस्थितीत, जर खेळाडू आणि आयपीएल फ्रँचायझींमध्ये असा करार असेल , तर ते त्या खेळाडूंना या लीगच्या त्यांच्या संबंधित संघांमध्ये उतरवू शकतात. काही आठवडे ट्वेंटी-२० लीगमध्ये खेळण्यासाठी त्यांना मोठी रक्कम मिळते म्हणून ही खेळाडूंसाठी आकर्षक ऑफर असू शकते. जे खेळाडू त्यांच्या बोर्डाशी कराराचा भाग नाहीत त्यांच्यासाठी ही ऑफर अधिक आकर्षक असू शकते. या अहवालानुसार खेळाडूंना वार्षिक करारात ५१ कोटी देण्याची ऑफर आहे.

आयपीएलमधील फ्रँचायझी मुंबई इंडियन्सचा संघ दक्षिण आफ्रिका ट्वेंटी-२० लीग, संयुक्त अरब अमिराती आणि अमिरेकितील लीगमध्ये खेळतोय... दक्षिण आफ्रिका ट्वेंटी-२० लीगमधीय सर्व सहा संघ हे आयपीएल फ्रँचायझीच्या मालकिचे आहेत. चेन्नई सुपर किंग्स, दिल्ली कॅपिटल्स, लखनौ सुपर जायंट्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांचे संघ SAT20 मध्ये खेळतात. कोलकाता नाइट रायडर्स फ्रँचायाझीचे संघ युएई, यूएसए आणि सीपीएलमध्ये आहेत. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

टॅग्स :आयपीएल २०२३टी-20 क्रिकेटकॅरेबियन प्रीमिअर लीगइंग्लंडन्यूझीलंड
Open in App