दिल्ली कॅपिटल्सच्या खेळाडूने पार्टीत महिलेला छेडलं अन् पुढे जे घडलं ते सर्वांना महागात पडलं!

IPL 2023, Delhi Capitals : इंडियन प्रीमिअर लीग २०२३ चा पहिला टप्पा संपला आहे आणि दिल्ली कॅपिटल्सचा संघ फक्त ४ गुणांसह तळावर आहे. ७ पैकी २ सामनेच त्यांना जिंकता आले आहेत आणि आता प्ले ऑफच्या शर्यतीत राहण्यासाठी त्यांनी उर्वरित ७ सामने जिंकायचे आहेत. अशात DC च्या खेळाडूने पार्टीत महिलेसोबत गैरवर्तवणून केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे आणि त्यामुळे सर्व खेळाडूंसाठी कठोर नियमावली तयार केली गेली आहे.

DC च्या खेळाडूने पार्टीत महिलेसोबत गैरवर्तवणून केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे आणि त्यामुळे सर्व खेळाडूंसाठी कठोर नियमावली तयार केली गेली आहे.

पार्टीत घडलेल्या घटनेनंतर फ्रँचायझीने ही नियमावली तयार केली आणि त्यानुसार खेळाडूंवर अनेक बंधन घातली गेली आहेत. खेळाडूंच्या रुममध्ये जाण्यासाठी आता पाहुण्यांना परवानगी घ्यावी लागेल. रात्री १० नंतर पाहुण्यांना एन्ट्री नसेल... डेव्हिड वॉर्नर आणि टीमचे लक्ष विचलित होऊ नये यासाठी आता फ्रँचायझी काळजी घेतेय.

इंडियन एक्स्प्रेसने दिलेल्या वृत्तानुसार सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या विजयानंतर दिल्ली कॅपिटल्सने त्यांच्या खेळाडूंसाठी नियमावली तयार केली. दिल्ली कॅपिटल्सच्या एका खेळाडूने पार्टीत महिलेसोबत गैरवर्तवणूक केली आणि फ्रँचायझीची प्रतिमा मलिन होणारा प्रसंग यापुढे घडू नये यासाठी ही नियमावली आहे.

आता दिल्ली कॅपिटल्सच्या खेळाडूंना रात्री १० नंतर कोणत्याही पाहुण्याला रुममध्ये बोलावता येणार नाही. आयपीएलच्या शिस्तपालन समितीच्या अधिकाऱ्याकडून तशी परवानगी मिळवावी लागेल आणि त्या पाहुण्यांना त्यांचे ओळखपत्र दाखवावे लागेल. पण, खेळाडू हॉटेलच्या रेस्ट्रॉरंट किंवा कॉफी शॉफमध्ये भेटू शकतात.

खेळाडूंना आता हॉटेलबाहेर जाण्यापूर्वी फ्रँचायाझीला कळवाले लागेल. पत्नी किंवा गर्लफ्रेंडला खेळाडूंसोबत प्रवासाची परवानगी आहे, परंतु त्यांचा प्रवासखर्च खेळाडूंनाच करावा लागणार आहे. कुटूंबातील सदस्य येण्यापूर्वी खेळाडूंना फ्रँचायझीला त्याची कल्पना द्यावी लागेल.

फ्रँचायझीच्या सर्व सोहळ्याला खेळाडूंनी उपस्थित राहणे गरजेचे आहे. नियमांचे उल्लंघन केल्यास खेळाडूवर दंडात्मक कारवाई किंवा त्याचा करार रद्द केला जाईल.