IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...

DC vs MI लढतीत या खेळाडूंवर असतील नजरा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2026 14:19 IST2026-04-04T14:17:26+5:302026-04-04T14:19:39+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
IPL Double Header Today DC v MI 8th First Match Live Streaming Toss Playing 11 Head To Head To Head Record And Key Players | IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...

IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...

IPL 2026 च्या १९ व्या हंगामातील पहिला डेबर हेडरचा थरार शनिवारी, ४ एप्रिलला पाहायला मिळणार आहे. दिल्ली कॅपिटल्सचा संघ दुपारच्या सत्रात आपल्या घरच्या मैदानात मुंबई इंडियन्सविरुद्ध मैदानात उतरेल. त्यानंतर संध्याकाळच्या सत्रात गुजरात टायटन्सचा संघ अहमदाबादच्या घरच्या मैदानात राजस्थान रॉयल्सच्या संघाला भिडणार आहे. इथं जाणून घेऊयात डबल हेडरमधील पहिला सामना कुठं रंगणार? कसा आहे दिल्ली कॅपिटल्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यातील रेकॉर्ड यासंदर्भातील सविस्तर माहिती

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
 

DC पेक्षा MI भारी, पण...

दिल्ली कॅपिटल्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यातील सामना दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर खेळवण्यात येणार आहे. दुपारी ३ वाजून ३० मिनिटांनी या सामन्यातील पहिला चेंडू टाकणे अपेक्षित आहे. सामन्यादरम्यान ५५ टक्के पावसाचा अंदाज वर्तवण्यात आल्यामुळे चाहत्यांचा हिरमोड होण्याचीही शक्यता आहे. आतापर्यंत ३७ लढती झाल्या असून २१ वेळा MI नं बाजी मारली असून १६ वेळा DC नं  विजय नोंदवला आहे. एकंदरीत रेकॉर्डमध्ये DC चा संघ मागे असला तरी घरच्या मैदानात ते ९-६ अशा आघाडीवर आहेत. त्यामुळे ही लढत रंगतदार होण्याची अपेक्षा आहे. दिल्लीच्या मैदानातील खेळपट्टी ही फलंदाज आणि गोलंदाजांसाठी अनुकूल असली तरी इथं अतिरिक्त बाऊन्स फलंदाजांना अडचणीत आणू शकतो.

VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही

DC vs MI लढतीत या खेळाडूंवर असतील नजरा

मुंबई इंडियन्सच्या संघाकडून सलामीच्या लढतीत रायन रिकल्टन आणि हिटमॅन रोहित शर्माच्या बॅटिंगचा खास नजराणा पाहायला मिळाला होता. या स्टार खेळाडूंसह पहिल्या सामन्या इम्पॅक्ट प्लेयरच्या रुपात खेळलेला सूर्या थेट प्लेइंग इलेव्हमध्ये दिसू शकतो.  गोलंदाजीत जसप्रीत बुमराह आणि बोल्ड यांच्या कामगिरीवर नजरा असतील. पहिल्या सामन्यात या जलदगती गोलंदाजांना छाप सोडता आली नव्हती. दिल्लीच्या संघाकडून डावाची सुरुवात करताना केएल राहुलच्या पदरी भोपळा पडला होता. दुसऱ्या सामन्यात स्टायलिश बॅटरचा क्लास दिसणार का? ते पाहण्याजोगे असेल. अनकॅप्ड समीर रिझवीसह डेविड मिलर आणि स्टब्स हा दिल्लीच्या फलंदाजीचा कणा आहे. गोलंदाजीत टी. नटराजन आणि लुंगी एनिगडी यांच्यावर संघाची मदार असेल.    

 सामना कधी अन् कुठं रंगणार? 

DC vs MI सामन्याची तारीख: शनिवार, ४ एप्रिल, २०२६  
वेळ: दुपारी ३:३० वाजता (भारतीय प्रमाणवेळेनुसार)
सामन्याचे ठिकाण : अरुण जेटली स्टेडियम, दिल्ली  

भारतामध्ये कुठे पाहता येळी सामना?

 जिओहॉटस्टार ॲप /वेबसाइटवर लाईव्ह स्ट्रीमिंग
 स्टार स्पोर्ट्स नेटवर्क चॅनेल्सवर थेट प्रसारण

दिल्ली कॅपिटल्स संभाव्य प्लेइंग इलेव्हन:

केएल राहुल (विकेटकीपर), पथुम निसंका, नितीश राणा, अक्षर पटेल (कर्णधार), ट्रिस्टन स्टब्स, डेविड मिलर, विपराज निगम, लुंगी एनगिडी, कुलदीप यादव, टी नटराजन, मुकेश कुमार. इम्पॅक्ट प्लेयर समीर रिझवी

मुंबई इंडियन्स प्लेइंग इलेव्हन :

रोहित शर्मा, रायन रिकेल्टन (विकेटकीपर), तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या (कर्णधार), शेरफेन रदरफोर्ड, शार्दुल ठाकूर, मयंक मार्कंडे, एएम गझनफर, ट्रेंट बोल्ट, जसप्रीत बुमराह. इम्पॅक्ट प्लेयर नमन धीर
 

Web Title : आईपीएल 2026: डीसी पर एमआई का दबदबा, लेकिन घरेलू मैदान मायने रखता है

Web Summary : आईपीएल हेड-टू-हेड रिकॉर्ड में मुंबई इंडियंस दिल्ली कैपिटल्स से आगे। हालाँकि, डीसी को घरेलू मैदान का फायदा है। दिल्ली में 4 अप्रैल को होने वाले मैच में बारिश की आशंका है। एमआई के लिए रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव और जसप्रीत बुमराह; डीसी के लिए केएल राहुल और टी. नटराजन जैसे प्रमुख खिलाड़ी शामिल हैं।

Web Title : IPL 2026: MI Dominates DC, But Home Ground Advantage Matters

Web Summary : Mumbai Indians lead Delhi Capitals in IPL head-to-head record. DC, however, holds home advantage. The April 4th match in Delhi anticipates rain. Key players include Rohit Sharma, Suryakumar Yadav, and Jasprit Bumrah for MI; KL Rahul and T. Natarajan for DC.