Join us

IPL Auction 2025: MS Dhoni चा 'भिडू' Mumbai Indians ने पळवला; दीपक चहरसाठी मोजले किती कोटी? जाणून घ्या

Deepak Chahar Mumbai Indians, MS Dhoni, IPL Auction 2025 Players List: धोनीच्या खास गोलंदाजांपैकी एक मानल्या जाणाऱ्या दीपक चहरवर मुंबईने यशस्वी बोली लावली.

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2024 18:07 IST

Open in App

Deepak Chahar Mumbai Indians, MS Dhoni, IPL Auction 2025 Players List: आगामी आयपीएलसाठी सुरु असलेल्या लिलावासाठी मुंबई इंडियन्सचा संघ एका अनुभवी वेगवान गोलंदाजाच्या शोधात होता. जसप्रीत बुमराह आणि ट्रेंट बोल्ट यांच्यासह तिसरा वेगवान गोलंदाज म्हणून मुंबईने दीपक चहरवर बोली लावण्यास सुरुवात केली. दीपक चहर हा महेंद्रसिंह धोनीचा जुना भिडू असल्याने मुंबईसह CSK ने देखील बोली लावायला सुरुवात केली. अवघ्या २ कोटींच्या मूळ किमतीवरून बोली वाढत गेली. ८ कोटींच्या बोलीपर्यंत मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात झुंज दिसली. त्यानंतर CSK ने माघार घेतली. त्यानंतर अचानक पंजाब किंग्जने बोलीत उडी घेतली. पण त्यांना फार पुढे जाता आले नाही. अखेर ९ कोटी २५ लाखांच्या मोठ्या बोलीवर मुंबई इंडियन्सने दीपक चहरला आपल्या ताफ्यात दाखल करून घेतले.

-----

गेल्या काही वर्षात दीपक चहर दुखापतीमुळे त्रस्त आहे. २०२२ साली त्याला संपूर्ण IPL बाहेर बसावे लागले. तर त्याने २०२३ च्या हंगामात १० आणि २०२४च्या हंगामात केवळ ८ सामने खेळले.  सध्या मात्र तो देशांतर्गत क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी करत आहे. त्याचा फायदा त्याला नक्कीच झाला.

त्याआधी दुसऱ्या दिवशीची सुरुवात मुंबईने एका खास खेळाडूसह केली. मुंबई इंडियन्सच्या संघानेही लिलावासाठी जोरदार तयारी केली असल्याचे सांगितले जात होते. या तयारीचा अंदाज कालच्या पहिल्या दिवसात फारसा आला नाही. पण दुसऱ्या दिवशी मुंबईने दमदार खेळी केली. लिलावाआधी करारमुक्त केलेल्या इशान किशनच्या जागी विकेट किपर म्हणून मुंबईने अवघ्या १ कोटी रुपयांचा एक खेळाडू संघात सामील करून घेतला. या खेळाडूचं नाव रायन रिकल्टन. तो साऊथ आफ्रिका टी२० लीग मध्ये MI Cape Town संघातूनही खेळतो. त्यामुळे मुंबईने त्याच्यावर विश्वास दाखवला.

टॅग्स :आयपीएल २०२४दीपक चहरआयपीएल लिलावमहेंद्रसिंग धोनीचेन्नई सुपर किंग्समुंबई इंडियन्स