Join us

IPL Auction 2020 : RCBनं आखलीय खास रणनीती; कोहलीनं सांगितला गेम प्लान Video

आठ संघांनी छाननी केल्यानंतर केवळ 332 खेळाडू लिलावाला सामोरे जाणार आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2019 18:32 IST

Open in App

इंडियन प्रीमिअर लीगच्या ( आयपीएल 2020) पुढील मोसमासाठी येत्या 19 डिसेंबरला लिलाव होणार आहे. या लिलावासाठी 971 खेळाडूंनी नावांची नोंदणी केली होती, परंतु आठ संघांनी छाननी केल्यानंतर केवळ 332 खेळाडू लिलावाला सामोरे जाणार आहेत. या यादित 186 भारतीय, 143 परदेशी आणि 3 संलग्न देशांतील खेळाडूंचा समावेश आहे. या लिलावापूर्वी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा ( RCB) कर्णधार विराट कोहलीनं चाहत्यांसाठी खास संदेश पाठवला आहे.   त्यात त्यानं म्हटलं आहे की,''RCBच्या चाहत्यांना हॅलो.. तुम्ही आम्हाला भरभरून प्रेम दिले. पुढील मोसमासाठी गुरुवारी लिलाव होणार आहे, हे तुम्हाला माहितच आहे आणि त्यातही तुम्ही संघाच्या पाठीशी राहा, अशी माझी इच्छा आहे. संघ व्यवस्थापन, माइक आणि सिमोन त्यांचे काम चोख बजावत आहेत. संघबांधणीसाठी आम्ही काही चर्चा केली आहे. त्यामुळे संघातील कमकुवत बाबी दूर करण्याचा आमचा प्रयत्न आहे. 2020च्या सत्रात तगडा संघ घेऊन मैदानावर उतरायचे आहे.''

RCBनं 13 खेळाडूंना कायम राखले आणि त्यात दोन परदेशी खेळाडूंचा समावेश आहे. आता त्यांच्याकडे 27.90 कोटी रुपये आहेत आणि त्यात त्यांना 12 खेळाडू आपल्या ताफ्यात घ्यायचे आहेत. 

IPL Auction 2020 : युवा नव्हे, तर वयस्कर खेळाडूही खाणार भाव!

IPL Auction 2020: परदेशी खेळाडू भाव खाणार, जाणून घ्या कोणाची किती मूळ किंमत...

विराट कोहलीची चिंता मिटली; IPL 2020साठी सलामीला मिळाला सक्षम पर्याय

IPL 2020 Players List : आयपीएलमधल्या कोणत्या खेळाडूंना संघात ठेवले कायम, जाणून घ्या...

IPL 2020 : सर्व आठ संघांची 'बजेट' सावरताना होणार तारांबळ; जाणून घ्या कोणाकडे किती संख्याबळ!  

IPL 2020: पुढील मोसमासाठी संघांनी केले अनेक दिग्गजांना रिलीज; पाहूया संपूर्ण यादी! 

IPL 2020 : आयपीएलच्या पुढील मोसमात संघ संख्या वाढणार; पाहा कोणाची लॉटरी लागणार

टॅग्स :आयपीएल लिलाव 2020आयपीएल 2020रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरविराट कोहली