Join us  

IPL Auction 2020: खेळाडूंवर कोट्यवधींची बोली लावणाऱ्या मुलीचा फोटो व्हायरल; पाहा आहे तरी कोण?

लिलावादरम्यान खेळाडूंवर कोट्यांची बोली लावताना एका मुलीचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 20, 2019 2:26 PM

Open in App

मुंबई: इंडियन प्रीमिअर लीगच्या ( आयपीएल 2020) पुढील मोसमासाठी कोलकातामध्ये खेळाडूंचा लिलाव झाला. यामध्ये आयपीएल मधील आठ संघाचे मालक व सहमालक यांच्यासह प्रत्येक संघाचे प्रशिक्षक संघाला आवश्यक असणाऱ्या खेळाडूंवर बोली लावत होते. या लिलावादरम्यान खेळाडूंवर  कोट्यवधींची बोली लावताना एका मुलीचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

सनरायझर्स हैदराबाद संघाकडून लिलावा दरम्यान संघाचे मेंटर वीवीएस लक्ष्मण, मुथय्या मुरलीधरन आणि प्रशिक्षक ट्रेवर बेलिस उपस्थित होते. मात्र या सर्वांसोबत एक मुलगी देखील सामील असल्याचे सर्वांच्या नजरा तिच्याकडे जात होत्या, ती म्हणजे सनरायझर्स हैदराबाद संघाचे मालक कलानिधि मारन यांची मुलगी काव्या मारन. काव्या सनरायझर्य हैदराबाद संघाची सहमालक देखील आहे.

पहिल्याच प्रयत्नात मुंबई इंडियन्सनं ख्रिस लीनला दोन कोटी मूळ किमतीत आपल्या ताफ्यात दाखल करून घेतले. त्यानंतर ऑस्ट्रेलियाच्या अॅरोन फिंचनं मोठी बोली लागली. विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघानं त्याला आपल्या ताफ्यात घेतले. पण, ऑसींच्याच ग्लेन मॅक्सवेलसाठी किंग्स इलेव्हन पंजाबनं 10.75 कोटी मोजली. मात्र, पॅट कमिन्सनं याही पुढे जात रेकॉर्ड तोड कमाई केली. 

लिलावाच्या तिसऱ्या फेरीत सनरायझर्स हैदराबादनं पुढील वर्षी दक्षिण आफ्रिकेत होणाऱ्या 19 वर्षांखालील वर्ल्ड कप संघासाठीच्या टीम इंडियाचा कर्णधार प्रियाम गर्ग आणि झारखंडचा विराट सिंग यांना हैदराबादनं आपल्या ताफ्यात घेतले. विराट आणि प्रियाम यांच्यासाठी हैदराबादनं प्रत्येकी 1.9 कोटी मोजले. विराटनं  सय्यद मुश्ताक अली स्पर्धेत 10 डावांत 57.16च्या सरासरीनं 343 धावा केल्या आहेत, तर पुढील वर्षी होणाऱ्या 19 वर्षांखालील वन डे वर्ल्ड कप स्पर्धेचे नेतृत्व प्रियामच्या खांद्यावर सोपवण्यात आले आहे. त्यानं देवधर चषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात 74 धावांची खेळी करताना संघाला विजय मिळवून दिला होता.

टॅग्स :आयपीएल लिलाव 2020आयपीएलसनरायझर्स हैदराबादचेन्नई सुपर किंग्समुंबई इंडियन्सआॅस्ट्रेलियाभारतकोलकाता नाईट रायडर्स