Join us  

IPL Auction 2020: ऑस्ट्रेलियाचा कर्णधार अ‍ॅरोन फिंचला मोठी बोली; RCBनं मारली बाजी

इंडियन प्रीमिअर लीगच्या ( आयपीएल 2020) पुढील मोसमासाठी कोलकाता येथे आज खेळाडूंचा लिलाव होणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 19, 2019 4:01 PM

Open in App

इंडियन प्रीमिअर लीगच्या ( आयपीएल 2020) पुढील मोसमासाठी कोलकाता येथे आज खेळाडूंचा लिलाव होणार आहे. 73 जागांसाठी 338 खेळाडू रिंगणार आहेत. या यादित 190 भारतीय, 145 परदेशी आणि 3 संलग्न देशांतील खेळाडूंचा समावेश आहे. 24 नव्या खेळाडूंचा समावेश असून यात वेस्ट इंडिजचा केस्रीक विलियम्स, बांगलादेशचा कर्णधार मुश्फीकर रहीम आणि ऑस्ट्रेलियाचा फिरकीपटू अॅडम झम्पा यांचा समावेश आहे. याशिवाय सरे संघाचा 21 वर्षीय फलंदाज विल जॅक्स याची एन्ट्री लक्षवेधी ठरत आहे. या लिलावात ऑस्ट्रेलियाच्या अॅरोन फिंचनं मोठी बोली लागली. विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघानं त्याला आपल्या ताफ्यात घेतले.

एक कोटी मूळ किंमत असलेल्या फिंचला RCBनं 4.40 कोटींत आपल्या ताफ्यात करून घेतलं. आयपीएलमधील त्याचा हा आठवा संघ आहे. यापूर्वी त्यानं राजस्थान रॉयल्स ( 2010), दिल्ली डेअरडेव्हिल्स ( 2011-12), पुणे वॉरियर्स इंडिया ( 2013), सनरायझर्स हैदराबाद ( 2014), मुंबई इंडियन्स ( 2015), गुजरात लायन्स ( 2016-17) आणि किंग्स इलेव्हन पंजाब ( 2018)  आदी संघांचे प्रतिनिधित्व केले आहे.

मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात स्फोटक फलंदाज; टी10 लीगमध्ये पाडलेला धावांचा पाऊस

या लिलावात पहिलेच नाव कोलकाता नाइट रायडर्सनं रिलीज केलेल्या ख्रिस लीनचं नाव आलं. या खेळाडूसाठी चुरस पाहायला मिळेल अशी अपेक्षा होती, परंतु मुंबई इंडियन्स या एकमेव संघानं त्याच्यासाठी बोली लावली. मुंबईनं 2 कोटीच्या मूळ किमतीत त्याला आपल्या ताफ्यात घेतले. कोलकाता नाइट रायडर्स ( KKR) संघानं रिलीज केलेल्या ऑस्ट्रेलियन फलंदाज ख्रिस लीनचं नाव सध्या जास्त चर्चेत आहे. लीनला डच्चू देण्याचा निर्णयाचा पश्चाताप KKRला होत आहे. कारण, लीननं टी 10 लीगमध्ये त्याची बॅट चांगलीच तळपली आहे आणि त्यानं स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कारही पटकावला. KKRनं रिलीज केल्यानंतर लीनची बॅट चांगलीच तळपली आहे. टी 10 लीगमध्ये मराठा अरेबियन्स संघाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या लीननं 8 डावांत 236.30 च्या स्ट्राईक रेटनं 371 धावा केल्या. त्याला स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार मिळाला.

IPL Auction 2020 : युवा नव्हे, तर वयस्कर खेळाडूही खाणार भाव!

IPL Auction 2020: परदेशी खेळाडू भाव खाणार, जाणून घ्या कोणाची किती मूळ किंमत...

विराट कोहलीची चिंता मिटली; IPL 2020साठी सलामीला मिळाला सक्षम पर्याय

IPL 2020 Players List : आयपीएलमधल्या कोणत्या खेळाडूंना संघात ठेवले कायम, जाणून घ्या...

IPL 2020 : सर्व आठ संघांची 'बजेट' सावरताना होणार तारांबळ; जाणून घ्या कोणाकडे किती संख्याबळ!  

IPL 2020: पुढील मोसमासाठी संघांनी केले अनेक दिग्गजांना रिलीज; पाहूया संपूर्ण यादी! 

IPL 2020 : आयपीएलच्या पुढील मोसमात संघ संख्या वाढणार; पाहा कोणाची लॉटरी लागणार

टॅग्स :आयपीएल लिलाव 2020आयपीएल 2020रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरअ‍ॅरॉन फिंच